शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
10
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
11
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
12
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
13
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
14
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
15
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
16
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
17
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
18
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
19
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
20
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video

मनू भाकरनं नीरज चोप्राबद्दल मौन सोडलं; कांस्य पदकविजेत्या खेळाडूनं फ्युचर प्लॅनिंग सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 3:06 PM

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने पाच कांस्य आणि एक रौप्य अशी एकूण सहा पदके जिंकली.

Neeraj Chopra Manu Bhaker : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधील रौप्य पदकविजेता नीरज चोप्रा आणि मनू भाकर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या व्हिडीओवरून नेटकऱ्यांनी भलताच तर्क लावत नीरज आणि मनू लग्न करणार असल्याची चर्चा सुरू झाली. (manu bhaker and neeraj chopra relationship) मात्र, मनूच्या वडिलांनी याला पूर्णविराम देत तिचे अद्याप लग्नाचे वय नसल्याचे सांगितले. (manu bhaker on neeraj chopra) आता खुद्द मनूने याबद्दल भाष्य केले आहे. तसेच तिने फ्युचर प्लॅनिंग सांगताना आवड जोपासणार असल्याचे म्हटले. (manu bhaker and neeraj chopra relationship news)

मनू भाकर म्हणाली की, माझ्यात आणि नीरजमध्ये असे काहीच नाही, ज्याची चर्चा रंगली आहे. तो एक वरिष्ठ खेळाडू आहे. मी पुढचे तीन महिने ब्रेक घेणार आहे. ब्रेकच्या कालावधीत मी व्हायोलिन वाजवीन आणि घोडेस्वारीचा आनंद घेईन. २०२८ मध्ये होणाऱ्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये आणखी चांगली कामगिरी करेन. मनू न्यूज १८ इंडिया या वृत्तसंस्थेशी बोलत होती.  ऑलिम्पिक २०२४ मध्ये पदक जिंकणारे खेळाडू नीरज चोप्रा (भालाफेक) - रौप्य पदकमनू भाकर (नेमबाज) कांस्य पदकअमन सेहरावत (कुस्ती)  कांस्य पदकभारतीय पुरूष हॉकी संघ - कांस्य पदकस्वप्नील कुसाळे (नेमबाज) - कांस्य पदकमनू भाकर-सरबजोत सिंग (नेमबाज) - कांस्य पदक  दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने पाच कांस्य आणि एक रौप्य अशी एकूण सहा पदके जिंकली. मागील ऑलिम्पिकपेक्षा यंदा भारताला एक पदक कमी मिळाले. भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने पदकाचे खाते उघडले. तर दुसरे पदक मनूने सरबजोत सिंगच्या साथीने जिंकले. याशिवाय पुरुषांच्या थ्री पोझिशन्स रायफल स्पर्धेत स्वप्नील कुसाळेने तिसरे स्थान मिळवून कांस्य पदकावर आपले नाव कोरले. मग भारताच्या हॉकी संघाने कांस्य पदक जिंकले, तर भालाफेकमध्ये मागील ऑलिम्पिकमधील चॅम्पियन नीरज चोप्राने रौप्य पदकाला गवसणी घातली. याशिवाय अमन सेहरावतने कुस्तीत कांस्य पदकाची कमाई केली. 

टॅग्स :Neeraj Chopraनीरज चोप्राparis olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४