शहरं
Join us  
Trending Stories
1
गणपती निघाले गावाला... मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, पालघरला विसर्जनासाठी सर्व यंत्रणा सज्ज
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी-व्यवसायात यश मिळण्याची शक्यता अधिक!
3
परीक्षांच्या तारखा जाहीर करा, शरद पवार यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
4
गिरीश महाजनांना धक्का, भाजपानं डावलल्याचा आरोप; निष्ठावंत नेता 'तुतारी' हाती घेणार
5
निसर्गोपचाराला हिरवा कंदील, राज्यात सुरू होणार पहिले नॅचरोपॅथी कॉलेज, आजरा येथे ६० बेडच्या हॉस्पिटललाही मंजुरी
6
‘राजपुत्र’ विधानसभेत नशीब अजमावणार? विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली
7
अवघड गणित होणार सोपे! शिक्षण विभाग शाळांमध्ये राबविणार गणित सात्मीकरण प्रणाली
8
राहुल गांधींवर वादग्रस्त वक्तव्य भोवलं, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल
9
८५ जागा खात्रीच्या, भाजपने केली कॅटेगरी; विधानसभेसाठी पक्षाची रणनीती
10
रसायनशास्त्राच्या शिक्षणाचा वापर एमडी ड्रग्ज बनविण्यासाठी; बदलापुरात केमिस्ट्रीतील उच्चशिक्षिताचा कारखाना उद्ध्वस्त
11
‘कुनो’मध्ये परदेशी पाहुण्यांची होतेय हेळसांड; सिंहांच्या पुनर्वसनासाठी कोणतेच प्रयत्न झाले नाहीत
12
पृथ्वीलाही होते शनीसारखे कडे! छुप्या खड्ड्यांनी उलगडले रहस्य
13
‘महा-हब’चे घोंगडे भिजत पडले ; नव उद्योजकांसाठीच्या प्रकल्पाला फक्त मान्यताच, अद्याप कार्यवाही नाही
14
सी-लिंकवर महागड्या कारची लागली रेस; वाहतूक एक तास खोळंबली
15
VIDEO: वंदे भारताला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी बाचाबाची, भाजप आमदार ट्रेनसमोर पडल्या
16
Chirag Paswan : "मी कोणालाच घाबरत नाही..."; पंतप्रधान मोदींसोबतच्या नात्याबद्दल चिराग पासवान यांचा खुलासा
17
माझी प्रचंड खिल्ली उडवली गेली, पण मी गप्प राहिलो; कारण..., पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले
18
'फक्त 5 तासांचा कार्यक्रम, 10 दिवस काय केले?' BJP नेत्याची राहुल गांधींच्या US दौऱ्यावर टीका
19
Shikhar Dhawan Video: गब्बर इज बॅक!! निवृत्तीनंतर पुन्हा एकदा शिखर धवनच्या हाती बॅट, केली तुफान फटकेबाजी
20
CM शिंदे दक्ष, नाराजांवर लक्ष! विधानसभेआधी तीन नेत्यांचे राजकीय पुनर्वसन

Paris Olympics 2024 : 'लक्ष्य' गाठलंच! ऑलिम्पिकच्या १२८ वर्षांच्या इतिहासात असं करणारा पहिला भारतीय ठरला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2024 10:38 PM

भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनची ऐतिहासिक झेप.

Paris Olympics 2024 Day 7 | पॅरिसभारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने ऐतिहासिक कामगिरी करताना उपांत्य फेरी गाठली. गुरूवारी त्याने त्याचा सहकारी प्रणॉयला चीतपट केले होते. आज शुक्रवारी तगड्या खेळाडूला पराभूत करण्यात लक्ष्यला यश आले. लक्ष्य सेनने बॅडमिंटन पुरुष एकेरीत चौ तिएन चेनचा १९-२१, २१-१५, २१-१२ असा पराभव केला. विशेष बाब म्हणजे ऑलिम्पिकच्या इतिहासात बॅडमिंटन पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा लक्ष्य हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. आता लक्ष्य तमाम भारतीयांचे लक्ष्य अर्थात पदक मिळवण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे.

पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीतील पहिल्या गेममध्ये लक्ष्य सेनला पराभवाचा सामना करावा लागला होता. प्रतिस्पर्धी खेळाडू वरचढ ठरल्याने भारतीयांची धाकधूक वाढली. पण, जिद्द न हरता त्याने विजयाच्या दिशेने कूच केली. पहिल्या गेममध्ये भारताचा शिलेदार २१-१९ असा पिछाडीवर होता. परंतु, लक्ष्य सेनने चमकदार कामगिरी करत दुसरा गेम जिंकला. त्याने २१-१५ अशा फरकाने विजय नोंदवला. या घडीला सामना १-१ असा बरोबरीत सुटला होता. पण, अखेर २१-१२ असा विजय मिळवण्यात लक्ष्यला यश आले.

दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने आतापर्यंत तीन कांस्य पदके जिंकली आहेत. भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने रविवारी पदकाचे खाते उघडले.तर दुसरे पदक मनूने सरबजोत सिंगच्या साथीने जिंकले. याशिवाय पुरुषांच्या थ्री पोझिशन्स रायफल स्पर्धेत स्वप्नील कुसाळेने तिसरे स्थान मिळवून कांस्य पदकावर आपले नाव कोरले. 

टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४BadmintonBadmintonIndiaभारत