Paris Olympics 2024 Updates : पॅरिसच्या धरतीवर ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा सुरू होण्यास अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. येत्या २६ जुलैपासून या स्पर्धेला सुरुवात होत आहे. ११ ऑगस्टपर्यंत विविध देशातील खेळाडू पदकासाठी लढतील. ऑलिम्पिकमधील ॲथलीट्स व्हिलेज हे क्रीडा विश्वाचे नेहमी लक्ष वेधून घेत असते. याचे कारणही तितकेच खास आहे. मागील अर्थात टोकियो ऑलिम्पिकमध्ये कारणास्तव खेळाडूंना काही निर्बंध घालण्यात आले होते. तेव्हा साथीच्या आजारामुळे सक्तीच्या निर्बंधांमुळे सामाजिक अंतर राखण्याचा सल्ला देण्यात आला होता. परंत, कालांतराने ही केवळ अफवा असल्याचे समोर आले. यंदा प्रेमाच्या शहरात पॅरिसमध्ये ऑलिम्पिकची स्पर्धा पार पडत आहे. नेहमीप्रमाणे यावेळी देखील ऑलिम्पिक व्हिलेजबद्दल काही अफवा पसरवल्या जात असल्याचे दिसते. पॅरिस ऑलिम्पिक ॲथलीट व्हिलेजमधील बेड आकाराने लहान असतील आणि ते अशा साहित्यापासून बनवलेले असतील जे क्रीडापटूंना स्पर्धेदरम्यान शारीरिक संबंध ठेवण्यापासून परावृत्त करतात, अशी चर्चा आहे.
मात्र, पॅरिस ऑलिम्पिकच्या आयोजकांनी चर्चेत असलेल्या विषयाला हात घालून स्पष्टीकरण दिले. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, ऑलिम्पिकच्या आयोजकांनी खेळाडूंसाठी यावेळीही खास व्यवस्था केली आहे. त्यांनी सांगितले की, ॲथलीट्स व्हिलेजमधील शिलेदारांना ३००,००० कंडोम उपलब्ध करून दिले जातील. पण, अशातच येथील बेड आकाराने लहान असतील आणि स्पर्धेदरम्यान ॲथलीट्सला लैंगिक संबंध ठेवण्यापासून परावृत्त करेल अशा सामग्रीपासून ते बनवलेले आहेत, अशी अफवा पसरवण्यात आली.
पॅरिस ऑलिम्पिक ॲथलीट व्हिलेजमधील बेड आकाराने लहान असतील आणि ते अशा साहित्यापासून बनवलेले आहेत, जे क्रीडापटूंना स्पर्धेदरम्यान शारीरिक संबंध ठेवण्यापासून परावृत्त करतात, अशी चर्चा जोर धरत आहे. खरे तर टोकियो ऑलिम्पिक्समध्ये खेळाडूंना देण्यात आलेल्या बेडची बरीच चर्चा रंगली होती. पॉल चेलिमो या अमेरिकन धावपटूने म्हटले होते की, टोकियो ऑलिम्पिकमध्ये स्पर्धेदरम्यान खेळाडूंना लैंगिक संबंध ठेवण्यापासून रोखण्यासाठी हलक्या कमी दर्जाच्या गाद्या (बेड्स) ठेवल्या गेल्या होत्या. विशेष बाब म्हणजे मागील काही वर्षांपासून खेळाडूंनी ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये लैंगिक संबंध ठेवल्याबद्दल उघडपणे भाष्य केले आहे. २००० साली सिडनी ऑलिम्पिकमध्ये ७०,००० कंडोम पुरेसे नव्हते, ज्यामुळे २०,००० ची दुसरी ऑर्डर देण्यात आली. तेव्हापासून प्रति ऑलिम्पिक १००,००० कंडोमची ऑर्डर देण्याचे ठरले.
२००८ मधील सुवर्ण पदक विजेती महिला फुटबॉल गोलकीपर होप सोलो हिने सांगितले होते की, ऑलिम्पिकच्या स्पर्धेदरम्यान खेळाडू मोठ्या प्रमाणात शारीरिक संबंध ठेवतात. अनेकांच्या तक्रारी आणि गाजत असलेला विषय यामुळे ऑलिम्पिक अधिकाऱ्यांनी यावर्षी बेडची निवड करण्याचे प्राथमिक कारण म्हणून टिकाऊपणाचा आवर्जुन उल्लेख केला. नवीन पुठ्ठे आणि इतर टिकाऊ वस्तूंचा वापर करून बेड्स तयार करण्यात आले असल्याचे ते सांगतात. याबद्दल बोलताना पॅरिस ऑलिम्पिकच्या अधिकाऱ्याने सांगितले की, २०२० पासून माध्यमांनी हा विषय उचलून धरला आहे. याबद्दल बरीच चर्चा सुरू असते. त्यामुळे आम्ही यावेळी बेड्स चांगल्या प्रकारचे बनवले आहेत. एका प्रात्यक्षिक दरम्यान आमच्या एका सहकाऱ्याने बेडवर उडी मारली आणि जोर दिला तेव्हा सिद्ध झाले की, संबंधित गाद्या त्यावर असलेल्या अनेक लोकांना आधार देऊ शकतात. पॅरिस ऑलिम्पिकच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले की, सर्व क्रीडापटूंसाठी बेड्स मजबूत असावेत यासाठी चांगल्या फर्निचरचा वापर करण्यात आला आहे. त्यावरून बेड्स आरामदायक आणि योग्य आहेत हे समजते.
टोकियो ऑलिम्पिकदरम्यान खेळाडूंना 'अँटी-सेक्स' बेड्स देण्यात आले असल्याची अफवा पसरली होती. पण, रायल मॅक्लेघन या खेळाडूने क्रीडाग्राममध्ये त्याला उपलब्ध करुन देण्यात आलेल्या खोलीतून एक व्हिडीओ शूट केला होता. त्यात त्याने कथित 'अँटी-सेक्स' कार्डबोर्ड बेडवर अगदी उड्या मारुन त्याची उच्चप्रतिची क्षमता आणि गुणवत्ता दाखवून दिली अन् सर्वांना विश्वास पटला. यामाध्यमातून मॅक्लेघनने सोशल मीडियात व्हायरल झालेल्या अँटी-सेक्स बेड्सच्या चर्चेला पूर्णविराम देण्याचे आवाहन केले.