शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राची पताका! कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेचा पराक्रम; भारताच्या खात्यात तिसरं 'ब्राँझ'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2024 1:49 PM

Paris Olympics 2024 Updates In Marathi : कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेने फायनलपर्यंत मजल मारली अन् इतिहास रचला.

Paris Olympics 2024 Day 6 Updates | पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या लेकाने अंतिम फेरीत धडक मारली अन् मोठे यश मिळवले. मूळचा कोल्हापूर येथील असलेल्या स्वप्नील कुसाळेने बुधवारी ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात अंतिम फेरीचे तिकीट मिळवले. (swapnil kusale in final) अंतिम फेरीत मातब्बर खेळाडू मैदानात होते. फायनलमध्ये सुरुवातीला स्वप्नील सहाव्या स्थानी होता. (swapnil kusale kolhapur) अंतिम फेरीत एकूण आठ स्पर्धक होते. (swapnil kusale shooting) प्रत्येक नेमबाजाला ४० शॉट्सची संधी होती. हे शॉट्स पूर्ण झाल्यानंतर सर्वात कमी गुण असलेले दोन खेळाडू स्पर्धेबाहेर झाले. नंतर प्रत्येक एका शॉटनंतर सुवर्ण आणि रौप्य पदक निश्चित होईपर्यंत प्रत्येक १-१ खेळाडू बाहेर होत गेला. (swapnil kusale latest news in marathi) 

Kneeling ची अर्थात पहिली फेरी पूर्ण होईपर्यंत स्वप्नील पाचव्या स्थानावर होता. आता स्टँडिंग शॉट्स पदकांचे चित्र स्पष्ट करणारे होते. यात स्वप्नीलने चमकदार कामगिरी करत तिसऱ्या स्थानापर्यंत मजल मारली. या राऊंडच्या अखेरपर्यंत यूक्रेनचा खेळाडू अव्वल तर चीनचा दुसऱ्या आणि भारताचा स्वप्नील तिसऱ्या स्थानावर राहिला. या घडीला पाच स्पर्धक स्पर्धेत जिवंत होते. पण यातील एक खेळाडू स्पर्धेबाहेर झाल्याने स्वप्नीलचे पदक पक्के झाले. कारण स्वप्नील आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या खेळाडूच्या गुणांमध्ये फार फरक होता. त्यामुळेच तिसऱ्या क्रमांकावर असलेला स्वप्नील पदक आणणार हे जवळपास निश्चित झाले. अखेर स्वप्नीलने ऐतिहासिक कांस्य पदक जिंकलेच. विशेष बाब म्हणजे खाशाबा जाधव यांच्यानंतर पदक जिंकणारा स्वप्नील महाराष्ट्रातील पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने ५० मीटर एअर रायफल प्रकारात ४५१.४ गुणांची कमाई केली. 

कोण आहे स्वप्नील कुसाळे?स्वप्नील कुसाळे हा महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. नेमबाज स्वप्निल कुसाळे कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यातील आहे. ६ ऑगस्ट १९९५ मध्ये जन्मलेल्या स्वप्निलने पॅरिसच्या धरतीवर चमक दाखवली. स्वप्निलचा ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास खूपच भारी आहे. अभिनव बिंद्राला २००८ च्या ऑलिम्पिकमध्ये खेळताना पाहण्यासाठी स्वप्निलने १२वीच्या परिक्षेकडे कानाडोळा केला. २००९ मध्ये वयाच्या १४व्या वर्षी त्याच्या वडिलांनी स्वप्निलला महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा प्रबोधिनी योजनेत दाखल केले. तिथूनच त्याचा क्रीडा क्षेत्रातील प्रवास सुरू झाला. सुरुवातीच्या काळात त्याने नेमबाजीतील आपले कौशल्य विकसित करण्यासाठी पुण्याला जाण्यापूर्वी नाशिकमध्ये प्रशिक्षण घेतले. स्वप्नील सुरेश कुसाळे या ग्रामीण भागातील खेळाडूने आपल्या मेहनतीच्या जोरावर ऑलिम्पिकपर्यंत मजल मारली. महाराष्ट्रातून पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंना महाराष्ट्र सरकारने पन्नास लाखांची मदत केली. सध्या रेल्वेमध्ये टि.सी असणारा स्वप्नील पुण्यातील बालेवाडी येथील क्रीडा संकुलात सराव करत होता. ऑलिम्पिक स्पर्धेत पात्र ठरल्यानंतर तो दिल्ली येथील रेंजवर सरावासाठी गेला होता.

टॅग्स :swapnil kusaleस्वप्नील कुसाळेkolhapurकोल्हापूरMaharashtraमहाराष्ट्रparis olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४