शहरं
Join us  
Trending Stories
1
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
2
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
3
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
4
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
5
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
6
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
7
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
8
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
9
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
10
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
11
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
12
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
13
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
14
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
15
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
16
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
17
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
18
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
19
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
20
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात

Vinesh Phogat CAS Hearing Verdict :निकालाआधी विनेशच्या वकिलाचे वक्तव्य आलं चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 5:58 PM

२४ तासांत प्रकरण निकाली लागते. पण विनेश फोगाटच्या प्रकरणात अधिक वेळ घेतला जात आहे.

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत विनेश फोगाटला अंतिम लढतीसाठी अपात्र ठरवण्यात आले. वजन काट्यानं नियमाची अगदी किंचित म्हणजे १०० ग्रॅमनं इतकी मर्यादा ओलांडली अन् विनेशसह भारताच्या सुवर्ण क्षण अनुभवण्याचे स्वप्नच धुळीस मिळालं. या प्रकरणात कुस्तीपटू विनेशनं आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे धाव घेतली आहे. ९ ऑगस्टला या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून आज (१३ ऑगस्ट) रात्री ९ वाजून ३० मिनिटांनी यासंदर्भात निकाल जाहीर होणार आहे. निकालाआधी विनेश फोगाटची बाजू मांडणाऱ्या वकील  मोठं वक्तव्य केले आहे.   

या गोष्टीमुळे मिळतात सकारात्मक निकालाचे संकेत 

विनेश फोगाट हिचे वकील विदुष्पत सिंघानिया यांनी निकाल सकारात्मक लागेल, अशी आशा व्यक्त केली आहे.  ते म्हणाले की, "सामान्यत: एडहॉक पॅन २४ तासांत या प्रकारचे प्रकरण निकाली काढत असते. पण विनेश फोगाटच्या प्रकरणात अधिक वेळ घेतला जात आहे. याचा अर्थ ते याचिकेचा गांभीर्याने विचार करत आहेत. 'अपेक्षा आहेत. त्यामुळे मेहनतीनं याचिका दाखल केली. निकालासाठी लागणारा वेळ सकारात्मक संकेत देणारा आहे." एवढेच नाही तर निकाल काहीही असो विनेश फोगट चॅम्पियन आहे, हे असा उल्लेखही त्यांनी केला आहे.

तर भारताच्या खात्यात दुसरं रौप्य

 १० ऑगस्टला जो निकाल अपेक्षित होता तो आता १३ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. डॉ. एनाबेले बेनेट एसी एससी (Dr Annabelle Bennett AC SC) या अंतिम निकाल देणार आहेत. विनेश फोगाटनं रौप्य पदक मिळावे, अशी मागणी केली आहे.जर निकाल विनेशच्या बाजूनं लागला तर भारताच्या खात्यात दुसऱ्या रौप्य पदकाची भर पडेल. 

विनेशचं 'चंदेरी' स्वप्न ज्या CAS च्या हाती आहे त्याच काम काय? 

आंतरराष्ट्रीय क्रीडा लवाद (Court of Arbitration for Sport) (CAS) ही जगभरातील खेळासंदर्भात न्याय देण्याचे काम करणारी एक स्वतंत्र संस्था आहे. खेळाशी संबंधित कायदेशी वाद-विवादाचा निवाडा या संस्थेमार्फत केला जातो. 1984 मध्ये स्थानप करण्यात आलेली ही संस्था खेळाडूसाठी न्यायाचं मंदिर आहे. इथं खेळाडूला न्याय मिळेल, अशी अपेक्षा असते. याचं मुख्यालय लॉजेन, स्वित्झर्लंड येथे आहे. याशिवाय न्यूयॉर्क शहर, सिडनी आणि लॉजेन येथेही खटले चालवले जातात. सध्याच्या घडीला ऑलिम्पिक पॅरिसमध्ये असल्यामुळे विनेशचा खटला हा पॅरिसच्या CSA मध्ये सुरु आहे. 

 विनेश फोगाट हिने फ्री स्टाईल कुस्ती प्रकारातील 50 किलो वजनी अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती. अंतिम लढती आधी 100 ग्रँम वजन अधिक भरल्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आले आहे.