शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

पुन्हा Gold चे स्वप्न भंगले; अमन सेहरावतचा सेमी फायनलमध्ये पराभव, 'ब्राँझ'ची आशा कायम...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2024 10:10 PM

कूस्तीच्या सेमी फायनलमध्ये जपानच्या रे हिगुची याने अमनचा 10-0 इतक्या मोठ्या फरकाने पराभव केला आहे.

Aman Sehrawat Wrestling, Paris Olympics 2024 : पॅरिसमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत आज(दि.8) कूस्तीच्या सेमी फायनलमध्ये 57 किलो वजनी गटात अमन सेहरावत (Aman Sehrawat) चा दारुण पराभव झाला आहे. जपानच्या रे हिगुची याने अवघ्या 1 मिनिट 14 सेकंदात अमनला 10-0 इतक्या मोठ्या फरकाने चितपट केले. विशेष म्हणजे, यापूर्वी झालेल्या क्वार्टर फायनलमध्ये अमनने अल्बेनियाच्या जेलिमखान एबकारोवचा 11-0 च्या फरकाने पराभव केला होता.  

चक दे इंडिया! भारतानं हॉकीत 'ब्राँझ' जिंकलं; सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदकाला गवसणी

विनेश फोगाटला ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवल्यानंतर सर्वांच्या नजरा अमन सेहरावतवर होत्या. त्याने सुरुवातीला क्वार्टर फायनल लढतीत अल्बेनियाच्या पैलवानाला मोठ्या फरकाने अस्मान दाखवले होते. त्याची खेळी पाहून सर्वांनी त्याच्याकडून पदकाची आशा ठेवली होती. पण, सेमी फायनलमध्ये जपानच्या पैलवानाने अमनचा  10-0 इतक्या मोठ्या फरकाने पराभव केला. 

सामन्याची सुरुवात होताच जपानच्या रे हिगुची याने आपली आक्रमक खेळी दाखवली. सुरुवातीच्या काही सेकंदात जपानच्या पैलवानाने 4 गुणांची आघाडी घेतली. यानंतर अमन जोरदार प्रत्युत्तर देईल असे वाटत होते, पण रे हिगुची याने आणखी गुण मिळवत सामन्यावर आपली पकड मजबूत केली. सामन्याच्या शेवटी अमनवर आपला अखेरचा डाव टाकत जपानच्या पैलवानाने 10 गुणांची आघाडी घेऊन सामना आपल्या नावाव केला.

अमनने हा सामना जिंकला असता, तर तो थेट अंतिम सामन्यात सुवर्णपदकासाठी खेळला असता. पण, या सामन्यातील पराभवामुळे अमन आणि संपूर्ण भारताचे सूवर्णपदकाचे स्वप्न भंगले आहे. आता अमनला आणखी एक संधी मिळणार असून, तो कांस्य पदकासाठी मैदानात उतरले. उद्या म्हणजेच, 9 ऑगस्ट रोजी कांस्य पदकाचा सामना होईल. या सामन्यात तो कांस्य पदक जिंकेल, अशी सर्वांना आशा आहे.

 

टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४Wrestlingकुस्तीIndiaभारत