पॅरिसमधील पॅरालिम्पिक २०२४ स्पर्धेत पहिल्या दिवशी वेगवेगळ्या ४ क्रीडा प्रकारात भारतीय खेळाडू मैदानात उतरल्याचे पाहायला मिळणार आहे. यात पॅरा बॅडमिंटन, पॅरा तायक्वांदो, पॅरा सायकलिंग आणि पॅरा आर्चरी या खेळांचा समावेश आहे.
पॅरा सायकलिंगमध्ये महाराष्ट्राची खेळाडू ज्योती गडेरिया ही ट्रॅक प्रकारातील ३००० मीटर शर्यतीत सहभाग होईल. जर तिने पात्रता फेरीत चमकदार कामगिरी नोंदवली तर पहिल्याच दिवशी भारताच्या खात्यात पदकही जमा होऊ शकते. कारण पॅरा सायकलिंगमधील ट्रॅक प्रकारात मेडलची लढत पहिल्या दिवशीच होणार आहे. याशिवाय महिला गटातील पॅरा तायक्वांदोतील पदकाची लढतही पहिल्या दिवशीच पाहायला मिळणार आहे. इथं पाहा पहिल्या दिवसाचे संपूर्ण वेळापत्रक
पॅरा बॅडमिंटन
- दुपारी १२ वाजता, मिश्र दुहेरी SL3 SU5 ग्रुप स्टेज ए (नितिश कुमार आणि तुलसीमाथी मुरुगेसन)
- दुपारी १२ वाजता, मिश्र दुहेरी SL3 SU5 ग्रुप स्टेज बी- (सुहास यथिराज आणि पलक कोहली)
- दुपारी १२ :४० नंतर, मिश्र दुहेरी SH6 ग्रुप स्टेज बी (सिवराजन आणि नत्या श्री)
- दुपारी ०२ :०० वाजल्यानंतर- महिला सिंगल SL3 ग्रुप स्टेज ए (मानसी जोशी)
- दुपारी ०२ :०० नंतर - महिला एकेरी SL3 ग्रुप स्टेज बी ( मनदीप कौर)
पॅरा तायक्वांदो
- दुपारी ०२ :३४ - महिला K 44 ४७ किलो वजनी गट राउंड ऑफ१६ (अरुणा)
पॅरा बॅडमिंटन
- दुपारी ०२ :३४ नंतर - पुरुष एकेरी SL4 ग्रुप स्टेज बी (सुकांत कदम)
- दुपारी ३:२० नंतर पुरुष एकेरी SL4 ग्रुप स्टेज डी (तरुण)
- दुपारी ३:२० नंतर पुरुष एकेरी SL4 ग्रुप स्टेज ए (सुहास यथीराज)
- दुपारी ४ नंतर पुरुष एकेरी SL3 ग्रुप स्टेज ए (नितेश कुमार)
- दुपारी ४ नंतर पुरुष एकेरी SL3 ग्रुप स्टेज ए (मनोज सरकार)
पॅरा सायकलिंग (ट्रॅक)
- दुपारी ०४:२५- महिला C1-3 ३००० मीटर वैयक्तिक पात्रता फेरी ज्योती गडेरिया
पॅरा आर्चरी/तिरंदाजी
- दुपारी ०४:३०- महिला वैयक्तिक कंपाउंड ओपन रँकिंग राउंड (शीतल देवी आणि सरिता कुमारी)
- दुपारी ०४:३०- पुरुष वैयक्तिक कंपाउंड ओपन रँकिंग राउंड (हरविंदर सिंग)
पॅरा बॅडमिंटन
- दुपारी ०४:४० नंतर- महिला एकेरी SL4 ग्रुप स्टेज सी (पलक कोहली)
पॅरा तायक्वांदो
- दुपारी ०४:४६ - महिला K44-४७ किलो वजनी गट उप उपांत्यपूर्व फेरी (अरुणा) (जर पात्र ठरली तर)*
पॅरा बॅडमिंटन
- सायंकाळी 0५:२० नंतर - महिला एकेरी SU5 ग्रुप स्टेज ए (तुलसीमाथी मुरुगेसन)
- सांयकाळी 0७:३० नंतर महिला एकेरी SU5 ग्रुप स्टेज सी ( मनिषा रामदास)
- सांयकाळी 0७:३० नंतर पुरुष एकेरी SH6 ग्रुप स्टेज ए (शिवराजन सोलेमलाई)
- सायंकाळी 0७:३० नंतर महिला एकेरी SH6 ग्रुप स्टेज ए (नित्या श्री सिवन)
पॅरा सायकलिंग (ट्रॅक)
- रात्री ०७:५४- महिला C1-3 ३००० मीटर शर्यत वैयक्तिक-ब्राँझ मेडल मॅच-(ज्योती गडेरिया (जर पात्र ठरली तर)*
पॅरा सायकलिंग (ट्रॅक)
- दुपारी ०८:११- महिला C1-3 ३००० मीटर शर्यत, वैयक्तिक-गोल्ड मेडल (ज्योती गडेरिया) (जर पात्र ठरली तर)*
पॅरा आर्चरी/तिरंदाजी
- रात्री ०८:३० - पुरुष वैयक्तिक कंपाउंड ओपन रँकिंग राउंड (राकेश कुमार, श्याम सुंदर स्वामी)
रात्री ०८:३०- महिला वैयक्तिक रेसक्युव्ह ओपन रँकिंग राउंड पूजा जत्यन)
पॅरा तायक्वांदो
- रात्री ०९:०१ - महिला K44-४७ किलो वजनी गट उपांत्यपूर्व फेरी (अरुणा) (जर पात्र ठरली तर)*
- रात्री १०:०७ - महिला K44-४७ किलो वजनी गट उपांत्य फेरी (अरुणा) (जर पात्र ठरली तर)*
पॅरा बॅडमिंटन
- रात्री १०: १० नंतर- मिश्र दुहेरी SL3-SU5 ग्रुप स्टेज ए (नितेश कुमार/ तुलसीमाथी मुरुगेसन)
पॅरा तायक्वांदो
- रात्री १०:४० - महिला K44-४७ किलो वजनी कांस्य पदकासाठीची लढत (अरुणा) (जर उपांत्य फेरीत पराभूत झाली असेल तर)*
पॅरा बॅडमिंटन
- रात्री १०: ५० नंतर-मिश्र दुहेरी SL3-SU5 ग्रुप स्टेज ए (सुहास यथिराज/ पलक कोहली)पॅरा तायक्वांदो
- मध्यरात्री १२:०४ - महिला K44-४७ किलो वजनी गट, सुवर्ण पदकासाठीची लढत (अरुणा) (जर उपांत्य फेरीत जिंकली असेल तर)*