पॅरिस येथील पॅरालिम्पिक स्पर्धेत चौथ्या दिवसाखेर भारताच्या खात्यात ७ पदके जमा झाली आहेत. पाचवा दिवस भारतीय खेळाडूंसाठी पदकांची लयलुट करणारा असणार आहे. दिवसाची सुरुवात पॅरा बॅडमिंटनमधील मेडल मॅचसह होणार आहे. नित्या श्री आणि सिवराजन ही भारताची जोडी कांस्य पदकासाठी कोर्टवर उतरेल. याशिवाय बॅडमिंटनमध्ये नितेश कुमार सुवर्ण पदकासाठी खेळताना दिसणार आहे. भालाफेक क्रीडा प्रकारातही भारताला सुमित अंतिलकडून गोल्डची अपेक्षा आहे. इथं पाहा संपूर्ण वेळापत्रक
पॅरा बॅडमिंटन
- दुपारी १२: ०० नंतर - : मिश्र दुहेरी SH6 कांस्य पदकासाठीची ळढत (नित्या श्री सिवन/शिवराजन सोलेमलाई)
पॅरा शूटिंग/ नेमबाजी
- दुपारी १२: ३० - : P3 मिश्र २५ मीटर पिस्तूल SH1 पात्रता फेरी (निहाल सिंग/ अमीर भट)
पॅरा अॅथलिटिक्स / मैदानी खेळ
- दुपारी ०१: ३० - : पुरुष गटातील थाळीफेक F66 अंतिम फेरी (योगेश कथुनिया)
पॅरा शूटिंग / नेमबाजी
- दुपारी ०४: ३० - : P3 मिश्र २५ मीटर पिस्तूल SH1 पात्रता फेरी रेपिड राउंड (निहाल सिंग/ अमीर भट) (जर पात्र ठरले तर)*
- रात्री ०८: १५ - : P3 मिश्र २५ मीटर पिस्तूल SH1 पात्रता फेरी अंतिम फेरी/मेडल इवेंट (निहाल सिंग/ अमीर भट) (जर पात्र ठरले तर)*
पॅरा आर्चरी/तिरंदाजी
- रात्री ०८: १५ - : मिश्र सांघिक कंपाउंड ओपन उपांत्य पूर्व फेरी (राकेश कुमार/ शीतल देवी) (जर पात्र ठरले तर)*
- रात्री ०९: ४० - : मिश्र सांघिक कंपाउंड ओपन उपांत्य फेरी (राकेश कुमार/ शीतल देवी) (जर पात्र ठरले तर)*
पॅरा अॅथलिटिक्स / मैदानी खेळ
- रात्री १०: ३० - : पुरुष गटातील भालाफेक F64 अंतिम फेरी (सुमित अंतिल/ संदीपय /संदीप सरगार)
पॅरा आर्चरी/तिरंदाजी
- रात्री १०: ३५ - : मिश्र सांघिक कंपाउंड ओपन कांस्य पदकासाठीची लढत (राकेश कुमार/ शीतल देवी) (जर पात्र ठरले तर)*
- रात्री १०: ५५ - : मिश्र सांघिक कंपाउंड ओपन सुवर्ण पदकासाठीची लढत (राकेश कुमार/ शीतल देवी) (जर पात्र ठरले तर)*
पॅरा अॅथलिटिक्स / मैदानी खेळ
- रात्री ११: ५० - : महिला गटातील ४०० मीटर टी२० पात्रता फेरी (दीप्ती जीवनजी)
पॅरा बॅडमिंटन (वेळ ठरलेली नाही)
- महिला एकेरी SH6 कांस्य आणि सुवर्ण पदकासाठीची लढत (नित्या श्री) (जर पात्र ठरली तर)*
- पुरुष एकेरी SL3 सुवर्ण पदकासाठीची लढत (नितेश कुमार)
- पुरुष एकेरी SL4 कांस्य आणि सुवर्ण पदकासाठीची लढत (सुहास यथिराज/सुकांत कदम)
- महिला एकेरी SU5 कांस्य आणि सुवर्ण पदकासाठीची लढत (तुलसीमाथी मुरुगेसन/मनिषा रामदास)