सदानंद नाईक, उल्हासनगर: महापालिकेने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात शुक्रवारी आले. ४६ प्रकारच्या क्रीडा स्पर्धेत ५७ शाळा-कॉलेज मधील १५ हजार २३६ मुलांनी सहभाग नोंदविला होता.
उल्हासनगर महापालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत ५७ शाळा- कॉलेज मधील मुलांनी सहभाग घेतला होता. आयुक्त अजीज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका कार्यक्षेत्रातील प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडूंनी ४६ प्रकारच्या क्रीडा स्पर्धेत एकुण ५७ शाळा-कॉलेज मधील १५२३६ खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. विजेत्या ४२७६ विजेत्या खेळाडूंना प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम शुक्रवारी संपन्न झाला. महापालिकेच्या क्रीडा विभागामार्फत सन २०२३-२४ पासून सर्वात जास्त प्राविण्य मिळविलेल्या शाळा-कॉलेज मधील खेळाडू मुलांना जास्तीत जास्त खेळांबाबत प्रोत्साहित करण्यात येत आहे. महापालिकातर्फ १४ वर्षा खालील खेळाडू स्वामी देवप्रकाश हायस्कूल मध्ये, १७ वर्षा खालील खेळाडू एस. ई. एस. हायस्कूल मध्ये, तर १९ वर्षा खालील खेळाडू, सी.एच.एम. कॉलेज मधील मैदानात सहभागी झाले होते.
उल्हासनगर महापालिकेला फिरते चषक मिळविण्याचा मान मिळवला आहे. सदर कार्यक्रमास उपायुक्त प्रियंका राजपुत, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे, अग्निशमन अधिकारी बाळू नेटके, प्रभाग अधिकारी अनिल खतुरानी, क्रीडा अधिकारी शांताराम चौधरी, क्रोडा समिती सदस्य प्रल्हाद कोलते, राहुल अकूल, प्रमोद पारसी, संजय पाटील, संजय डमाळे, दक्षता पवार, प्रिया मयेकर, सुनिल पाटील आदींच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला आहे.