शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
4
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
5
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
6
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
7
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
8
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
9
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
10
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
11
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
12
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
13
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
14
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
15
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
16
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
17
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
18
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
19
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
20
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध

पटना पायरेट्स पहिल्यांदाच ‘चॅम्पियन’

By admin | Published: March 06, 2016 3:16 AM

अखेरपर्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात मोक्याच्या वेळी बाजी मारत पटना पायरेट्सने प्रो कबड्डीच्या तिसऱ्या सत्राचे दिमाखदार विजेतेपद पटकावत गतविजेत्या यू मुंबाला ३१-२८ असे नमवले

प्रो कबड्डी : मुंबईकरांचे उपविजेतेपदावर समाधान रोहित नाईक,  नवी दिल्लीअखेरपर्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात मोक्याच्या वेळी बाजी मारत पटना पायरेट्सने प्रो कबड्डीच्या तिसऱ्या सत्राचे दिमाखदार विजेतेपद पटकावत गतविजेत्या यू मुंबाला ३१-२८ असे नमवले. त्याचवेळी याआधी झालेल्या सामन्या पुणेरी पलटणने स्पर्धेत तिसऱ्या स्थानावर कब्जा करताना बंगाल वॉरियर्सचे आव्हान ३१-२७ असे परतावले.इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या या अंतिम सामन्यात सुरुवातीला बचावफळी सपशेल अपयशी ठरल्याचा मोठा फटका मुंबईला बसला. २९व्या मिनिटापर्यंत पटना एका गुणाने आघाडीवर असताना कर्णधार अनुप कुमारने अखेरच्या मिनिटात मुंबईला महत्त्वपूर्ण बरोबरी साधून दिली. मात्र, दीपक नरवालने निर्णायक चढाई करताना संघाला २९-२८ असे आघाडीवर नेल्यानंतर अनुप चढाई करताना मैदानाबाहेर गेला आणि नंतर संदीप नरवालने जीवा कुमारला बाद करून पटनाच्या पहिल्या वहिल्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. दोन्ही संघांनी तोडीस तोड खेळ करताना सामन्याची रंगत वाढवली. ५व्या मिनिटापासून पटनाने वर्चस्व मिळवण्यास सुरुवात केली. यू मुंबाच्या चुकांचा फायदा घेत पटनाने जबरदस्त पकड मिळवली. ७व्याच मिनिटाला मुंबईवर लोण चढवून पटनाने १०-२ अशी मजबूत आघाडी घेतली. मुंबईकरांच्या पकडी सपशेल अपयशी ठरत होत्या. पकडीमध्ये पहिला गुण मिळवण्यासाठी मुंबईला तब्बल १५व्या मिनिटापर्यंत वाट पाहावी लागली. या वेळी मोहित चिल्लरने पहिली यशस्वी पकड केली. मात्र, तरीही मुंबईकर ८ गुणांनी पिछाडीवर होते. मुंबईकर पुनरागमन करणार, असे वाटत असतानाच रोहित कुमारने सुपर रेडसह पटनाची स्थिती आणखी मजबूत केली. पुन्हा एकदा मुंबईवर लोणचे संकट असताना मोहित चिल्लरने बदली खेळाडू सुरेंदर नाडासह सुपर टॅकल केली. तरीही मुंबईकर पुनरागमन करण्यात अपयशी ठरले. १९व्या मिनिटाला अनुभवी शब्बीर बापूला मैदानात बदली खेळाडू म्हणून उतरवले, मात्र तोही चमक दाखवू शकला नाही. मध्यंतराला पटनाने १९-११ असे वर्चस्व राखले. ३०व्या मिनिटाला पटनावर लोण चढवून मुंबईकरांनी झुंजार खेळ केला; मात्र अखेरच्या अत्यंत दबावामध्ये मुंबईकरांचे नियंत्रण सुटल्याने त्यांना स्पर्धेत दुसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.संपूर्ण स्पर्धेत मुंबईच्या प्रत्येक विजयात निर्णयाक कामगिरी केलेला रिशांक देवाडिगा या वेळी अपयशी ठरला. अनुपने एकाकी लढत देताना ८ गुण मिळवले, तर बचावात मोहित चिल्लरने एका सुपर टॅकलसह ६ गुणांची कमाई केली. पटनाकडून रोहित कुमारने आक्रमणात, तर संदीप नरवालने अष्टपैलू खेळ करताना संघाच्या विजेतेपदामध्ये मोलाचे योगदान दिले. विजेतेपद निश्चित झाल्यानंतर पटनाच्या ‘पायरेट्स’चा जल्लोष जबरदस्त होता, तर पराभवाची निराशा मुंबईकरांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसली. तत्पूर्वी, चुरशीच्या सामन्यात पुणेरी पलटनने बंगाल वॉरियर्सचे कडवे आव्हान ३१-२७ असे परतावून तिसरे स्थान पटकावले. सुरुवातीला बंगालने पुणेकरांवर दडपण ठेवले; मात्र ११व्या मिनिटापासून सामन्याचे चित्र पालटताना पुण्याने दमदार खेळ केला. पुणेकरांनी बंगालवर २ लोण चढवले. बंगालने ३४व्या मिनिटाला लोण चढवून पुनरागमनाचे प्रयत्न केले. मध्यंतराला १५-८ अशी आघाडी घेतल्यानंतर पुण्याचा खेळ अधिक आक्रमक झाला. > वैयक्तिक पारितोषिकेसर्वोत्कृष्ट आक्रमक : रिशांक देवाडिगा (यू मुंबा)सर्वोत्कृष्ट बचावपटू : संदीप नरवाल (पटना पायरेट्स)सर्वोत्कृष्ट खेळाडू : रोहित कुमार (पटना पायरेट्स)उदयोन्मुख खेळाडू : रोहित कुमार (पटना पायरेट्स)