शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

पटणा पायरेट्सचा दमदार ‘चौकार’

By admin | Published: February 09, 2016 3:30 AM

प्रदीप नरवालने केलेल्या निर्णायक सुपर रेडच्या जोरावर मिळवलेली आघाडी अखेरपर्यंत टिकवताना पटणा पायरेट्सने प्रो-कबड्डीमध्ये विजयी घोडदौड कायम राखताना तेलगू टायटन्सचे

- रोहित नाईक,  कोलकाताप्रदीप नरवालने केलेल्या निर्णायक सुपर रेडच्या जोरावर मिळवलेली आघाडी अखेरपर्यंत टिकवताना पटणा पायरेट्सने प्रो-कबड्डीमध्ये विजयी घोडदौड कायम राखताना तेलगू टायटन्सचे तगडे आव्हान २९-२५ असे परतावले.नेताजी सुभाषचंद्र बोस स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात सुरुवातीला दोन्ही संघांनी एकमेकांचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करताना बचावात्मक पवित्रा घेतला. पटणाने अपेक्षेप्रमाणे गुणांची कमाई केल्यानंतर तेलगू संघानेही जोरदार प्रत्युत्तर देताना सामना जवळजवळ बरोबरीत राखला होता. मात्र १७व्या मिनिटाला प्रदीपने निर्णायक सुपर रेड करताना तब्बल ४ गडी बाद केले. शिवाय यासह तेलगू संघावर लोणही चढल्याने या एकाच चढाईत पटणाने ६ गुण कमावताना १६-९ अशी मोठी आघाडी घेतली. हीच आघाडी अखेर निर्णायक ठरली.मध्यंतराला पटणाने १८-११ असे वर्चस्व राखल्यानंतर तेलगू संघाने दुसऱ्या सत्रात आक्रमक पवित्रा घेतला. मात्र प्रयत्न फसल्याने पटणाने २४-१७ अशी मोठी आघाडी घेत सामना आपल्याबाजूने झुकवला. कर्णधार राहुल चौधरी, सुकेश हेगडे यांनी काही अप्रतिम चढाई करताना तेलगूची पिछाडी कमी केली. मात्र संदीप नरवाल, विनोद कुमार यांनी दमदार पकडी करून पटणाच्या विजयावर शिक्का मारला. प्रदीपने पटणाला एकहाती विजय मिळवून देताना ११ गुण मिळवले. बंगालकडून दिल्ली पराभूतपहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत असलेल्या दबंग दिल्लीला पाचव्या सामन्यातही पराभूत व्हावे लागले. तुफान फॉर्ममध्ये असलेल्या यजमान बंगाल वॉरियर्सने आक्रमक खेळाच्या जोरावर दिल्लीला ३४-१७ असे लोळवले. मध्यंतराला १८-७ अशा आघाडीसह यजमानांनी सामन्याचा निकाल स्पष्ट केल. यानंतर बंगालने आणखी वेगवान खेळ करत दिल्लीला पुनरागमनाची संधीच दिली नाही. सांघिक खेळ केलेल्या बंगालपुढे दिल्लीकरांचा अखेरपर्यंत निभाव लागला नाही.