शहरं
Join us  
Trending Stories
1
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
2
दुधाच्या अनुदान वाढीवरून अजित पवार आणि विखे पाटलांमध्ये खडाजंगी; बैठकीत नेमकं काय घडलं?
3
ही आहेत चार प्रभावशाली कुटुंब, ज्यांच्याकडे आहे तिरुपतीच्या पूजेची जबाबदारी, एवढं मिळतं मानधन, आहे कोट्यवधीची संपत्ती
4
Telegram सीईओ Pavel Durov दबावाला बळी पडले? IP Address, नंबर शेअर करणार!
5
तिरुपती लाडू वाद: मंदिरात सफाई, देवाची माफी मागणार; पवन कल्याण करणार ११ दिवस प्रायश्चित्त
6
“विरोधकांनी राजकारण करायची गरज नाही”; अक्षय शिंदे एन्काउंटरवर रामदास आठवले थेट बोलले
7
Akshay Kumar : "आवाज केला असता तर गोळ्या घातल्या असत्या"; अक्षय कुमारने सांगितला चंबळचा थरारक अनुभव
8
रद्द करण्यात आलेले तीन कृषी कायदे परत आणावेत; कंगना राणौतची मोठी मागणी
9
T20 World Cup 2024 : 'स्वप्न'पूर्तीसाठी टीम इंडिया सज्ज! 'मन' खूप झालं आता 'जग' जिंकण्यासाठी हरमन है तय्यार
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या राजीनामा देणार? सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर ठरणार भवितव्य
11
शेअर बाजारावर बॉट्सचा ताबा, FII ट्रेडर्सनं अल्गोरिदममध्ये फेरफार केला; ५९००० कोटींची कमाई : SEBI
12
पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह, अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी ठाकरे गट कोर्टात जाणार
13
"मी शरद पवारांना दैवत मानत आलोय", अजित पवार सुप्रिया सुळेंवर का भडकले?
14
स्वच्छता कर्मचारी गोळ्या कसा झाडेल? अक्षय शिंदे एन्काउंटरवर संजय राऊतांच्या फैरीवर फैरी
15
पाकिस्तान क्रिकेटला लवकरच 'अच्छे दिन'! कोच कर्स्टन यांना विश्वास; खेळाडूंसमोर ठेवल्या ३ अटी
16
KL राहुल मर्जीतला; टीम इंडियात सुरुये Sarfaraz Khan ला रिलीज करण्याचा विचार
17
Monkeypox : टेन्शन वाढलं! ज्याची भीती होती तेच घडलं; भारतात पोहोचला मंकीपॉक्सचा खतरनाक व्हेरिएंट
18
IND vs BAN: "...तर अश्विनला आधीच निवृत्ती घ्यायला लावली असती"; माँटी पानेसारचे मत
19
Munawar Faruqui buys Flat in Mumbai: मुनव्वर फारुकीने मुंबईत खरेदी केला कोट्यवधींचा फ्लॅट, कुठून होते इतकी कमाई?
20
नवीन मोबाईलची खरेदी अन् आयुष्याचा शेवट! मित्रांनीच केला घात, पार्टी न दिल्याने तरुणाची हत्या

पेले यांच्या लग्नाची 'हॅट्ट्रीक', ३३ वर्षांहून लहान असलेल्या मार्सियासह जुळल्या रेशीम गाठी

By admin | Published: July 10, 2016 6:50 PM

फुटबॉल विश्वातील महान खेळाडू ब्राझीलचे पेले यावेळी वेगळ्याच चर्चेत आले असून शनिवारी रात्री ते तिसऱ्यांदा लग्नाच्या बोहल्यावर चढले आणि तेही वयाच्या ७५व्या वर्षी

ऑनलाइन लोकमतसाओ पावलो, दि. १० : फुटबॉल विश्वातील महान खेळाडू ब्राझीलचे पेले यावेळी वेगळ्याच चर्चेत आले असून शनिवारी रात्री ते तिसऱ्यांदा लग्नाच्या बोहल्यावर चढले आणि तेही वयाच्या ७५व्या वर्षी. गेल्या सहावर्षांपासून प्रेयसी असलेल्या मार्सिया सिबेले आओकी हिच्यासोबतच पेले यांनी लग्न केले. दखल घेण्याची बाब म्हणजे मार्सिया ही पेले यांच्याहून ३३ वर्षांनी लहान आहे.पेले यांनी येथील एका वर्तमानपत्रासह बोलताना सांगितले की, यंदा त्यांना आयुष्यभरासाठी खरं प्रेम मिळाले आहे. पेले आणि मार्सिया १९८०च्या दशकात न्यूयॉर्क येथे भेटले होते. मात्र त्यानंतर २०१० साली साओ पावलो येथे एका एलेवेटरवर पुन्हा एकदा भेट झाल्यानंतर दोघेही एकमेकांच्या जवळ आले होते.

दरम्यान, अत्यंत साध्या पध्दतीने लग्नसमारंभ उरकताना पेले यांनी कोणताही मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले नाही. पेले यांचे याआधी दोनवेळा लग्न झाले असून रोसमेरी चोलबी ही त्यांची पहिली पत्नी आहे आणि तीच्यापासून पेले यांना तीन अपत्य आहेत. तसेच अभिनेत्री एसिरिया नासीमेंटो हिच्याशी पेले यांचे दुसरे लग्न झाले असून एसिरियापासून देखील पेले यांना दोन अपत्य आहेत.

मार्सिया सध्या ४२ वर्षांची असून ती व्यावसायिक आहे. २०१२ सालापासून ती तीन वेळक्जे जागतिक विजेते पेले यांच्यासह सर्व सार्वजनिक कार्यक्रमात दिसते. विशेष म्हणजे, काही महिन्यांपुर्वी पेले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यावेळी मार्सिया त्यांच्यासोबतंच होती. जागतिक फुटबॉलमधील महान खेळाडू म्हणून ख्याती असलेल्या पेले यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये १३६३ सामने खेळताना १२८१ गोल केले आहेत. यातील ९१ गोल ब्राझीलकडून खेळताना केले आहेत.