शहरं
Join us  
Trending Stories
1
वंचितने आपणच पाठिंबा दिलेल्या अपक्षाला दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

इटलीचा बेल्जियमविरुद्ध परफेक्ट स्टार्ट

By admin | Published: June 15, 2016 5:19 AM

कोच एंटोनियो कोंटेची जबरदस्त रणनिती आणि एमानुएल गियाशेरेनी तसेच ग्राजियानो पेले यांच्या भन्नाट गोलच्या जोरावर इटलीने युरो चषक फुटबॉल स्पर्धेत बेल्जियमला २-0 ने हरवून परफेक्ट स्टार्ट केला.

लियोन : कोच एंटोनियो कोंटेची जबरदस्त रणनिती आणि एमानुएल गियाशेरेनी तसेच ग्राजियानो पेले यांच्या भन्नाट गोलच्या जोरावर इटलीने युरो चषक फुटबॉल स्पर्धेत बेल्जियमला २-0 ने हरवून परफेक्ट स्टार्ट केला.इटलीने आपल्या पहिल्या सामन्यात जबरदस्त आक्रमता आणि सर्वोत्कृष्ट रणनितीचे दर्शन घडविले. विरोधी संघावर प्रतिहल्ले आणि बेजोड बचाव याच्या आधारावर बेल्जियमविरुध्द ४४ वर्षे अपराजित राहण्याचे रेकॉर्डही इटलीने अबाधित राखले. बेल्जियमकडून इटली १९७२ साली हरला होता.बेल्जियमकडून ईडन हेजार्ड, केव्हीन डी ब्रुएने आणि रोमेलू लुकाकू यांनी चांगली कामगिरी केली, परंतु ते आपल्या संघाला गोल मिळवून देवू शकले नाहीत. इटालियन प्रशिक्षकांनी सामन्यात पूर्वार्धात ३-५-३ असे कॉम्बिनेशन ठेवले होते. यामध्ये माटीयो डारमियान आणि एंटोनिया कानड्रेवा यांनी आक्रमण आणि बचावाचे उत्कृष्ट उदाहरण दाखवून दिले. त्यामुळे इटलीच्या मधल्या फळीला गोल करण्याची संधी मिळत गेली. जरी चेंडूवर बेल्जियमचे नियंत्रण अधिक काळ असले तरी ३२ व्या मिनिटाला गियाशेरेनी याने इटलीला १-0 अशी आघाडी मिळवून दिली.मध्यंतरानंतर दोन्ही संघांनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले. ५३ व्या मिनिटाला लुकाकूने ५३ व्या मिनिटाला बरोबरी करण्याची संधी वाया घालवली. यानंतर इटलीला गोल करण्याच्या सलग दोन संधी मिळाल्या होत्या. सामना संपण्यास काही सेकंद उरले असताना पेलेचा फटका गोलरक्षक थिबाउट काउटोरिसने अडवला. यानंतर लगेचच सिरो इमोबाईलचा गोलचा प्रयत्नही यशस्वी झाला नाही. इन्ज्युरी टाईममध्ये कॉनड्रेवाच्या क्रॉसवर पेलेने गोल करुन संघाला २-0 ने विजय मिळवून दिला.(वृत्तसंस्था)