अभिजित देशमुखथेट जकार्ता येथून
येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केली आहे. अजूनही काही क्रीडा प्रकारांत आपले खेळाडू अंतिम किंवा उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. २०२० च्या आॅलिम्पिक स्पर्धेच्या दृष्टीने ही कामगिरी उल्लेखनीय आहे. बॅडमिंटन, तिरंदाजी यांसारख्या क्रीडा प्रकारांत आपल्या खेळाडूंकडून पदक जिंकण्याची अपेक्षा आहे. आज अॅथलेटिक्समध्येसुद्धा आपल्या खेळाडूंनी रौप्यपदके जिंकली आहेत.
आम्ही क्रीडाक्षेत्राला खूप प्रोत्साहन देत आहोत, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी क्रीडाला खूप प्राधान्य दिले आहे. आॅलिम्पिकसाठी खास टास्क फोर्स सुरू करणारे ते पहिले पंतप्रधान आहेत. तसेच ग्रासरूट्सवर आम्ही सुधारणा करत आहोत, ज्या क्रीडासाठी सर्वांत आवश्यक आहे त्या ‘खेलो इंडिया’ स्पर्धेच्या माध्यमातून बरेच प्रतिभाशाली खेळाडू विविध क्रीडा प्रकारांत मिळाले आहेत. त्यांनी इथे पदकसुद्धा जिंकले. भविष्यात खेलो इंडिया स्पर्धेच्या माध्यमातून चांगल्या खेळाडूंचा शोध लागणार आहे. तसेच, एलिट खेळाडूंसाठी आम्ही व्यावसायिक लोकांची नियुक्ती केली आहे, त्यांना लागणारे साहित्य आणि सगळी मदत आम्ही देत आहोत. निधीमध्येसुद्धा कुठलीच कमी नाही, क्रीडा विज्ञानसुद्धा आम्ही खेळमध्ये जोडत आहे.
स्थानिक भारतीय कुटुंबांकडूनखेळाडूंना ‘जय हो इंडिया’चा नारादुर्ग, छत्तीसगढ येथील अतुल जैन व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने आतापर्यंतबजरंग पूनिया, विनेश फोगटच्या अंतिम लढतींच्या वेळी ‘जय हो इंडिया’चा नारा देत प्रोत्सहान दिले होते. सुवर्णपदकाचा सामना, हॉकीमध्ये भारताच्या हाँगकाँगवर
ऐतिहासिक २६-० गोलने विजय, भारतीय महिला कबड्डीअंतिम सामनासुद्धा पहिला आहे. आम्ही अजून अॅथलेटिक्स, बॉक्सिंग, तिरंदाजीकडेसुद्धा जाणार आहे. सर्व पदकविजेतासोबत सेल्फी काढण्यासाठी त्यांनी ‘आय लव्ह इंडिया’ नावाचे की-चेन देऊन अशी शक्कल लढवली आहे. जैन कुटुंब जकार्तामध्ये २०११ पासून राहत असून, घरातील सर्व पुरुष सदस्य अतुल, विजय आणि अशोक खासगी उद्योग समूहात म्हणून काम करत आहे.