शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
2
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
4
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
5
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
6
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
7
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
8
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
9
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
10
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
11
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
12
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
13
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
14
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
15
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
16
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
17
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
18
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
19
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
20
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी

ही कामगिरी आॅस्ट्रेलियात महत्त्वपूर्ण ठरेल

By admin | Published: November 04, 2014 1:40 AM

आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व राहण्याची शक्यता आहे

कटक : आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व राहण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली श्रीलंकेविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान इशांत शर्मा आणि उमेश यादव यांच्या शानदार कामगिरीवर जाम खुश झाला आहे.या लढतीत भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद ३६३ असा धावांचा डोंगर रचला. त्यानंतर संघात पुनरागमन करणाऱ्या इशांतने श्रीलंकन फलंदाजांना खूपच अडचणीत आणले.पॉवरप्ले पहिले घेतल्याच्या निर्णयाविषयी कोहलीने हे आपले पाऊल लाभदायक ठरल्याचे म्हटले. तो म्हणाला, युवा संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी माझ्यासाठी आवडीचे आहे आणि विश्वचषक उंबरठ्यावर असल्यामुळे मी रोमांचित होतो. दोन्ही फलंदाजांनी आपला चांगला जम बसवला होता आणि त्यामुळे मी डंकन फ्लेचर यांच्याशी पॉवर प्ले लवकर घेण्याविषयी चर्चा केली होती.वेगवान गोलंदाज वरुण अ‍ॅरोन दुखापतग्रस्त झाल्यामुळे आपण जास्त जोखीम घेऊ इच्छित नव्हतो. त्यामुळे त्याला मैदानाबाहेर पाठवल्याचेही कोहली म्हणाला. तो म्हणाला, अ‍ॅरोनला चौथ्या षटकानंतर त्रास होत होता आणि त्याची जखम इतकी गंभीर नसल्याचे मला माहीत होते. मी कोणतीही जोखीम घेऊ इच्छित नव्हतो. त्यामुळे मी त्याला विश्रांती करण्यास सांगितले. (वृत्तसंस्था)