शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

एका रात्रीत चित्र बदलले

By admin | Published: March 07, 2017 12:50 AM

मालिकेत चार दिवसांच्या खेळानंतर आॅस्ट्रेलिया संघ भारतीय खेळाडूंच्या नजरेला नजर भिडवत विचारत होता

हर्षा भोगले लिहितो..मालिकेत चार दिवसांच्या खेळानंतर आॅस्ट्रेलिया संघ भारतीय खेळाडूंच्या नजरेला नजर भिडवत विचारत होता, ‘तुम्ही आम्हाला बच्चे समजले होते, पण तुम्ही तर मायदेशातच कमकुवत भासत आहात, खरे आहे ना हे?’ भारतीय संघाला अनपेक्षित कोनातून आपल्याच बॉक्सिंग ग्लव्हजमधून ठोशे स्वीकारावे लागले. चॅम्पियन्स संघ निमूटपणे हे सहन करीत असल्याचे चित्र दिसले. या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर आणि दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला काय घडले हे मला माहीत नाही. याची माहिती घेण्यासाठी माशी बनून भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममधील भिंतीवर बसायला मला आवडले असते. एका रात्रीत भारतीय संघाचे रूप पालटले. चवताळलेला भारतीय संघ आॅस्ट्रेलियावर चालून गेला. त्यामुळे उभय संघांदरम्यान कसोटी खेळाची रंगत अनुभवाला मिळाली. तिसऱ्या दिवशी तर भारतीय संघाने काही अंशी वर्चस्वही मिळवले. सध्या यार्ड पुढे आहे असे म्हणण्यापेक्षा इंचभर पुढे आहे, असे म्हणणे सयुक्तिक ठरेल. भारताने चाहत्यांसह आणि अधिक महत्त्वाचे म्हणजे स्वत:ला लढवय्या संघ असल्याचे दाखवून दिले. लोकेश राहुल दर्जेदार क्रिकेटपटू म्हणून आपली पाळेमुळे घट्ट करीत आहे. चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांनी यापूर्वीच स्वत:ला सिद्ध केलेले आहे. कुठल्याही खेळाडूसाठी फलंदाजीला खडतर असलेल्या या खेळपट्टीवर या तिन्ही क्रिकेटपटूंनी शानदार खेळी केली. पहिल्या दिवसाचा खेळ बघितल्यानंतर भारतीय संघाची कामगिरी अविश्वसनीय भासत आहे. भारतात मात्र हे घडत असते. या खेळपट्टीवर फलंदाजांनी जबाबदारीने खेळणे आवश्यक आहे. येथे १८०-२०० धावांचे लक्ष्य पुरेसे नाही. भारताला येथे ३००च्या जवळपास धावांच्या लक्ष्याची गरज आहे. त्यासाठी खेळपट्टीवर असलेल्या पुजारा व रहाणे यांच्या व्यतिरिक्त करुण नायर याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. पहिल्या डावात चमकदार कामगिरी करणाऱ्या नॅथन लियोनचा मारा खेळताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. ३०० धावांचे लक्ष्य असले म्हणजे कोहली आणि आश्विनला संयम बाळगता येईल. कमी धावसंख्येचे लक्ष्य असेल तर त्यांच्यावर मर्यादा येईल. संयम बाळगला तर अनुकूल निकाल मिळवता येतात आणि घाई केली तर चूक होण्याची शक्यता असते. पुजारा व रहाणे लढवय्ये फलंदाज आहेत. कारकिर्दीत त्यांनी बरेचदा अशी कामगिरी केली आहे. मंगळवारी त्यात जर ते यशस्वी ठरले तर ही मालिका पुणे सोडल्यानंतर भासली होती त्यापेक्षा नक्कीच वेगळी भासेल. (पीएमजी)