सिडनी : तब्बल १३८ वर्षांची परंपरा असलेल्या कसोटी क्रिकेट स्पर्धेत येत्या शुक्रवारपासून (दि.२७) गुलाबी युगाची सुरूवात होत आहे. अॅडिलेडमध्ये आॅस्ट्रेलिया-न्यूझिलंड सामन्याद्वारे दिवस-रात्र कसोटी सामना खेळला जाणार असून, यात प्रथमच गुलाबी रंगाच्या चेंडूचा वापर करण्यात येणार आहे. खेळातील उत्कंठा वाढावी, कसोटी क्रिकेटला अधिकाधिक प्रेक्षक मिळावेत या साठी नवीन बदल करण्यात येत आहेत. या विषयी बोलताना क्रिकेट आॅस्ट्रेलियाचे प्रमुख सदरलँड म्हणाले, क्रिकेटला अधिक मनोरंजक बनविणे ही काळाची गरज आहे. मला सर्वप्रकारचे क्रिकेट आवडत असले, तरी माझी पहिली पसंती ही कसोटी हीच आहे. जर आत्ताच पाऊले उचलली नाही, तर कसोटी क्रिकेट संपुष्टात येईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) प्रमुख जहीर अब्बास यांनी बदलाचे स्वागत केले. मात्र काही खेळाडूंकडून या निर्णयाची खिल्ली उडविण्यात आली आहे. तर काहींनी गुलाबी रंगाचा चेंडू लवकर खराब होत असल्याचा आक्षेप घेतला आहे. (वृत्तसंस्था)डे-नाईट कसोटीचा प्रयोग यशस्वी होईल!आॅस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांच्यात अॅडिलेड येथे गुलाबी चेंडूने डे-नाईट कसोटी होणार आहे. याबाबत नागपूर येथे बोलताना भारताचा कर्णधार विराट कोहली म्हणाला, ‘ काही खेळाडू गुलाबी चेंडूबाबत प्रतिक्रिया देत आहेत. दिवसा खेळ चांगला होईल पण फ्लडलाईट सुरू होण्याआधी सायंकाळी चेंडू पकडणे कठीण होईल, असे मत पुढे आले. पण ऐतिहासिक कसोटी यशस्वी झाल्यास हा पर्याय पुढे येईल. उभय संघ अशी ऐतिहासिक कसोटी खेळण्यास राजी झाले. डे-नाईट कसोटीची प्रथा पडल्यास क्रिकेट लोकप्रिय होण्याचे ते माध्यम ठरू शकते.’
कसोटीत गुलाबी युगाचा प्रारंभ
By admin | Published: November 24, 2015 11:57 PM