शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

पायरेट्सचा धडाका कायम

By admin | Published: February 10, 2016 3:35 AM

पटणा पायरेट्स संघाने झुंजार खेळाचे शानदार प्रदर्शन करताना पिछाडीवरून बाजी मारत यजमान बंगाल वॉरियर्सला ३६-३१ असा धक्का दिला. या विजयासह सलग पाचवा विजय मिळवताना

- रोहित नाईक,  कोलकातापटणा पायरेट्स संघाने झुंजार खेळाचे शानदार प्रदर्शन करताना पिछाडीवरून बाजी मारत यजमान बंगाल वॉरियर्सला ३६-३१ असा धक्का दिला. या विजयासह सलग पाचवा विजय मिळवताना पटणाने प्रो-कबड्डी स्पर्धेमध्ये २५ गुणांसह अग्रस्थानी कब्जा केला.नेताजी सुभाषचंद्र बोस स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात यजमानांनी अपेक्षेप्रमाणे आक्रमक सुरुवात करत वर्चस्व राखले. जँन कून ली आणि नितीन तोमार यांनी जबरदस्त चढाया करताना पटणावर दडपण टाकले. मध्यंतराला १७-१६ अशी नाममात्र आघाडी घेतलेल्या बंगालला पहिल्या डावात पटणावर दोन वेळा लोण चढवण्याची संधी होती. मात्र पहिल्यांदा गिरीश एर्नाक तर नंतर रोहित कुमार यांनी चढाईत प्रत्येकी ३ बळी घेत संघाला सावरले.दुसऱ्या सत्रात मात्र पटणा पायरेट्सने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. २२व्या मिनिटाला बंगालवर लोण चढवून पटणाने २१-१७ अशी आघाडी घेतली. हीच आघाडी त्यांनी अखेरपर्यंत कायम राखली. यानंतर यजमानांनी पुनरागमनाचे प्रयत्न केले. मात्र दडपणाखाली ते अपयशी ठरले. ३१व्या मिनिटाला पटणाने दुसरा लोण चढवून ३१-२३ अशा भक्कम आघाडीसह विजय जवळजवळ निश्चित केला. अखेरच्या क्षणी बंगालने पिछाडी कमी केली खरी; मात्र दडपणाखाली चुका झाल्याने पटणाने बाजी मारली.पटणाकडून रोहितने ११ गुणांसह निर्णायक खेळ केला. तर प्रदीप नरवालने (७) आक्रमण आणि संदीप नरवालने (७) दमदार बचावाद्वारे त्याला साथ दिली. त्याच वेळी यजमान बंगालकडून जँग कून लीने पुन्हा एकदा चमक दाखवताना अष्टपैलू झुंज दिली. त्याने एका सुपर टॅकलसह ९ गुण मिळवले. नितीन तोमरनेही खोलवर चढाया करताना ९ गुणांची वसुली केली.