शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

खेळपट्टी गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरेल

By admin | Published: March 16, 2017 1:23 AM

भारत - आॅस्टे्रलिया दरम्यान रांची येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष २२ यार्डच्या खेळपट्टीकडे लागले आहे.

- अयाझ मेमन , संपादकीय सल्लागारभारत - आॅस्टे्रलिया दरम्यान रांची येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष २२ यार्डच्या खेळपट्टीकडे लागले आहे. रांचीची खेळपट्टीदेखील पुणे व बंगळुरूप्रमाणे गोलंदाजांना जास्त फायदेशीर राहणार का, ही खेळपट्टी पहिल्याच दिवसापासून फिरकी घेणार का, असे प्रश्न सर्वांना पडत असले, तरी याचे उत्तर मात्र कोणाकडेही नाही. खेळपट्टीकडे पाहून तरी असेच वाटते की, ही पाटा विकेट नक्कीच नसणार आणि अशी खेळपट्टी नसायलाच हवी. कारण, भारतात पाटा विकेट असेल, तर जिंकण्याची शक्यता फार कमी असते. त्याचबरोबर ही खेळपट्टी वेगवान नसेल. यावर गवताचे प्रमाण कमी आहे. शिवाय, वेगवान खेळपट्टी बनवून आॅस्टे्रलियाला मदत का करावी?माझ्या मते ही खेळपट्टी पुणे आणि बंगळुरूप्रमाणे फिरकी गोलंदाजांनाच मदतशीर ठरेल. मात्र, मला वाटते की खेळपट्टीला इतकेही महत्त्व देऊ नये की, खेळाडूंची कामगिरी खेळपट्टीवर अवलंबून राहील. त्याचबरोबर नाणेफेकीचा कौल निर्णायक ठरू शकतो. सुरुवातीला पाहिल्याप्रमाणे पुणे आणि बंगळुरू येथे नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने सामनाही जिंकला. मात्र, तरीही नाणेफेकीवर ५०-५० संधी आहे. त्यामुळे नाणेफेक कोणीही जिंकू दे, चांगल्या कामगिरीचा प्रयत्न भारतीय संघाचा असला पाहिजे. बंगळुरूमध्ये भारतीय फलंदाजांनी व गोलंदाजांनी दाखवून दिले की, पहिल्या डावात पिछाडीवर असल्यानंतरही जिंकता येते. त्यामुळे सामना जिंकायचा असेल, तर भारतीयांना त्याच आत्मविश्वासाने खेळावे लागेल.संघ रचनेबाबत बोलायचे झाल्यास माझ्यामते भारतीय संघात खास बदल करण्याची आवश्यकता नाही. मुरली विजय खांदा दुखापतीतून सावरला असेल, तर तो आपली जागा पुन्हा घेईल. कारण, तो सातत्यपूर्ण सलामीवीर राहिला असून, त्याच्या जागी खेळलेल्या अभिनव मुकुंदने फार काही करून दाखवले नाही. त्याव्यतिरिक्त मला काही बदल दिसत नाही. तसेच, तीन फिरकीपटू खेळवण्याचीही काहीच गरज दिसत नाही. कारण, रविचंद्रन आश्विन आणि रवींद्र जडेजा संघासाठी चांगली कामगिरी करीत आहेत. त्याचबरोबर उमेश यादव - इशांत शर्मा ही वेगवान जोडी कायम राहील. फिरकी खेळपट्टीवरही या जोडीने चांगला मारा केला आहे. दुसरीकडे, आॅस्टे्रलियासाठी अनेक अडचणी आहेत. मिचेल मार्श, मिचेल स्टार्क हे दोन्ही आघाडी खेळाडू जखमी आहेत. खास करून स्टार्कची अनुपस्थिती आॅस्टे्रलियाला प्रकर्षाने जाणवेल. त्याने मालिकेत जास्त बळी घेतले नसले, तरी जबरदस्त मारा करीत त्याने धावाही काढल्या आहेत. त्याच्या जागी पॅट कमिन्सला संधी मिळू शकते. तसेच, मार्शच्या जागी धडाकेबाज अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल की मार्कस स्टॉइनीसला संधी मिळते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. स्टॉइनीस मध्यमगती गोलंदाज असून चांगली फलंदाजी करतो, तर मॅक्सवेल धुवाधार फलंदाजीसह उपयुक्त फिरकी माराही करतो. त्यामुळे आॅसीसाठी खूप विचार करावा लागणार आहे; पण डेव्हिड स्मिथ, स्टीव्ह स्मिथ, नॅथन लिआॅन, जोश हेजलवूड आणि स्टिव्ह ओकीफी या खेळाडूंनी आॅस्टे्रलियाच्या विजयाच्या संधी निर्माण केल्या असून, यांच्यावर कांगारूंची अधिक मदार असेल.