शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

पंजाबला पीयूष ‘चावला’

By admin | Published: May 09, 2015 11:57 PM

अखेरच्या षटकापर्यंत रंगतदार ठरलेल्या लढतीत कोलकाता नाईट रायडर्सने सुनील नरेनचा अचूक मारा, आंद्रे रसेल व पीयूष चावलाची आक्रमक फलंदाजी

कोलकाता : अखेरच्या षटकापर्यंत रंगतदार ठरलेल्या लढतीत कोलकाता नाईट रायडर्सने सुनील नरेनचा अचूक मारा, आंद्रे रसेल व पीयूष चावलाची आक्रमक फलंदाजी यांच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा एक गडी राखून पराभव केला आणि आयपीएलच्या आठव्या पर्वात विजयाच्या हॅट््ट्रिकसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेतली. पंजाब संघाने दिलेल्या १८४ धावांचे लक्ष्य केकेआर संघाने १ चेंडू व १ गडी राखून पूर्ण केले. केकेआर संघाच्या विजयात कॅरेबियन फिरकीपटू सुनील नरेन (४-१९), आंद्रे रसेल (५१ धावा, २१ चेंडू, ५ चौकार, ४ षटकार), युसूफ पठाण (२९ धावा, १९ चेंडू, १ चौकार, ३ षटकार) व पीयूष चावला (१८ धावा, ११ चेंडू, २ चौकार, १ षटकार) यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. या लढतीतील अखेरचे षटक नाट्यमय ठरले. त्यात निकालाचे पारडे दोलायमान असल्याचे दिसून आले. या षटकात यजमान संघाला विजयासाठी ७ धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवर एक धाव घेतल्यानंतर ब्रॅड हॉग धावबाद झाला. त्यानंतर पीयूष चावलाने षटकार ठोकून संघाला लक्ष्याच्या समीप नेले; पण पुढच्याच चेंडूवर तो रिद्धिमान साहाकडे झेल देऊन माघारी परतला. त्यानंतर खेळपट्टीवर आलेल्या सुनील नरेनने लेगबायची एक धाव घेऊन संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयानंतर गत चॅम्पियन केकेआर संघाने १२ सामन्यांत १५ गुणांची कमाई करताना गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेतली. ११ सामन्यांत १४ गुणांची कमाई करणारा चेन्नई संघ दुसऱ्या स्थानी आहे. ११ सामन्यांत नववा पराभव स्वीकारणारा पंजाब संघाच्या खात्यावर ४ गुणांची नोंद आहे. पंजाब संघ प्ले आॅफच्या शर्यतीतून बाहेर फेकल्या गेला आहे. यंदाच्या मोसमात ईडन गार्डन्सवर अखेरचा सामना खेळणाऱ्या केकेआर संघाने विजयाची हॅट््ट्रिक नोंदवून स्थानिक चाहत्यांचा निरोप घेतला. त्याआधी, ग्लेन मॅक्सवेलची २२ चेंडूंतील ४३ धावांची खेळी व आघाडीच्या फळीतील फलंदाजांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने ५ बाद १८३ धावांची दमदार मजल मारली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या पंजाब संघाला मुरली विजय व मनन व्होरा यांनी सलामीला ३४ चेंडूंत ४५ धावांची भागीदारी करून चांगली सुरुवात करून दिली. फिरकीपटू सुनील नरेनने विजयला (२४ धावा, २२ चेंडू) बाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली. बीसीसीआयकडून क्लीन चिट मिळाल्यानंतर दमदार पुनरागमन करणाऱ्या नरेनने ४ षटकांत १९ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. त्याने १७व्या षटकात मॅक्सवेल व रिद्धिमान साहा यांना बाद करून पंजाब संघाला २०० धावांचा पल्ला गाठण्यापासून रोखले. मनन व्होरा (३९ धावा, ३४ चेंडू, १ चौकार, ३ षटकार) नरेनचा दुसरा बळी ठरला. या स्पर्धेत प्रथमच सूर गवसल्याचे संकेत देणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलला नरेनने बाद करून पंजाब संघाला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. मॅक्सवेलने २२ चेंडूंना सामोरे जाताना ४ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ४३ धावांची खेळी केली . नरेनने त्यानंतर रिद्धिमान साहा (३३ धावा, २५ चेंडू, २ षटकार) याला बाद केले. मिलरने अखेरच्या षटकात रसेलला २ चौकार व २ षटकार मारून पंजाबला १८३ धावांची मजल मारून दिली. मिलरने ११ चेंडूंत नाबाद २७ धावा फटकावल्या. (वृत्तसंस्था)