मुंबई : प्रो कबड्डी लीगच्या सातव्या हंगामाला 20 जुलैपासून सुरुवात होणार आहे. तेलुगू टायटन्स आणि यू मुंबा यांच्यात सलामीचा सामना हैदराबाद येथील गचिबोवली स्टेडियमवर होणार आहे. दुसऱ्या सामन्यात गतविजेता बंगळुरू बुल्स आणि तीन वेळेचा विजेता पाटणा पायरेट्स हे भिडणार आहेत. प्रो कबड्डी लीगमधील थरार कायम राखण्यासाठी यंदा फॉरमॅटमध्ये बदल करण्यात येणार असल्याचे आज जाहीर करण्यात आले. लीगचा अंतिम सामना 19 ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे. मराठमोळा सिद्धार्थ देसाई यंदा तेलुगू टायटन्सकडून खेळणार आहे आणि सलामीलाच सिद्धार्थ विरुद्ध यू मुंबा असा सामना पाहायला मिळेल.
- चढाईपटू - अभिषेक सिंग, अर्जुन देश्वास, अतुल एमएस, डाँग जीओन ली, गौरव कुमार, नवनीत, रोहित बलियान, विनोथ कुमार
- बचावपटू - राजगुरु सुब्रमनियम, हर्ष वर्धन, अनील, हरेंद्र कुमार, यंग चँग को, फजल अत्राची, सुरेंद्र सिंग
- अष्टपैलू - अजिंक्य करपे, मोहित बलयान, संदीप नरवाल
यू मुंबाचे सामने20 जुलै - वि. तेलुगू टायटन्स22 जुलै - वि. जयपूर पिंक पँथर्स27 जुलै - वि. पुणेरी पलटन28 जुलै - वि. बंगळुरू बुल्स31 जुलै - वि. यूपी योद्धा2 ऑगस्ट - वि. गुजरात सुपरजायंट्स9 ऑगस्ट - वि. बंगाल वॉरियर्स16 ऑगस्ट - वि. पाटणा पायरेट्स19 ऑगस्ट - वि. हरयाणा स्टीलर्स23 ऑगस्ट - वि. तमीळ थलायवाज28 ऑगस्ट - वि. दबंग दिल्ली31 ऑगस्ट - वि. जयपूर पिंक पँथर्स5 सप्टेंबर - वि. पुणेरी पलटन11 सप्टेंबर - वि. बंगाल वॉरियर्स13 सप्टेंबर - वि. तेलुगू टायटन्स18 सप्टेंबर - वि. यूपी योद्धा22 सप्टेंबर - वि. गुजरात फॉर्च्युनजायंट्स27 सप्टेंबर - बंगळुरु बुल्स30 सप्टेंबर - वि. तमीळ थलायव्हाज2 ऑक्टोबर - वि. पाटणा पायरेट्स10 ऑक्टोबर - वि. हरयाणा स्टीलर्स11 ऑक्टोबर - वि. दिल्ली दबंग