शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
2
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
3
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 
4
तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाचा तपास एसआयटीकडून स्थगित, सांगितलं 'हे' कारण...
5
विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा
6
"अंबानींच्या लग्नावर करोडोंचा खर्च, पण शेतकरी...", राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
Badlapur Sexual Assault Case: मोठी बातमी! बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना झटका; कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला
8
रोहित की गंभीर? कानपूर टेस्टमध्ये ट्विस्ट आणण्यात नेमकं कुणाचं डोकं?
9
सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट
10
“भाजपासाठी महाराष्ट्र हे ATM, मोदी-शाह यांच्या दौऱ्याचा मविआलाच फायदा”; काँग्रेसची टीका
11
"विमानांप्रमाणे आता एसटीच्या ई- शिवनेरी बसमध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी’’, भरत गोगावले यांची घोषणा
12
Irani Cup 2024 : मैं हूँ ना! मुंबईचा खडतर प्रवास; पण अजिंक्य रहाणेचा 'संयम', अय्यर-सर्फराजची चांगली साथ
13
'घड्याळ' चिन्हाबाबत आजही सुनावणी झालीच नाही; सुप्रीम कोर्टाने दिली पुढची तारीख
14
“आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा मनोज जरांगे असतील”; तिसऱ्या आघाडीतील नेत्याचे मोठे विधान
15
जय पवार की अजित पवार, बारामतीतून कोण लढणार? प्रदेशाध्यक्षांनी गोंधळ संपवला
16
"तुझ्या भावाकडून सुंदर मूल हवंय"; दिरासोबत पळून गेली बायको, नवरा म्हणतो, मला वाचवा कारण...
17
'219 मंदिरांची विटंबना, मूर्तींची तोडफोड', उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा धक्कादायक दावा
18
"लव्ह जिहाद, व्होट जिहाद म्हणून फडणवीस यांनी केला समतेच्या मूल्याचा अपमान, जाहीर माफी मागा’’, काँग्रेसची मागणी 
19
जय शाहांचा वारसदार कोण होणार? BCCI सचिव पदासाठी आशिष शेलारांसह 'ही' ४ नावं चर्चेत
20
धक्कादायक! वाराणसीमधील १० मंदिरांमधून हटवली साईबाबांची मूर्ती, समोर आलं असं कारण

PKL 2024 : संघानं खूप 'भाव' दिला, आता करुन दाखवायचंय; यू मुंबाचा कर्णधार म्हणतो 'है तय्यार हम'

By ओमकार संकपाळ | Published: October 01, 2024 3:04 PM

pkl u mumba captain 2024 : यू मुंबा सुनील कुमारच्या नेतृत्वात खेळेल.

ओमकार संकपाळ

u mumba captain sunil kumar : प्रो कबड्डी लीगच्या इतिहासातील सर्वात ग्लॅमरस संघ असलेल्या यू मुंबाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सुनील कुमारवर सोपवण्यात आली आहे. नवीन हंगामात नवीन कर्णधाराच्या नेतृत्वात असलेल्या यू मुंबासमोर खूप आव्हाने आहेत. मात्र, ही आव्हाने मोडून ट्रॉफीपर्यंतच्या प्रवासासाठी आपण सज्ज असल्याचे सुनील कुमारने 'लोकमत'शी बोलताना सांगितले. यू मुंबाचा कर्णधार झालो याचा खूप आनंद असून, या संघाने आणि व्यवस्थापनाने दाखवलेला विश्वास यावर खरा उतरण्यासाठी मेहनत घेत असल्याचे सुनील कुमारने नमूद केले. 

"आता माझ्यासमोर काही आव्हाने आणि मोठी जबाबदारी आहे. दुसऱ्या हंगाामाचा किताब पटकावल्यानंतर आणि तिसऱ्या हंगामात अंतिम फेरी गाठल्यानंतर यू मुंबाला पुन्हा म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. पण, आगामी अकराव्या हंगामात खूप मेहनत करू आणि यू मुंबाला दुसऱ्यांदा चॅम्पियन करण्याच्या इराद्याने खेळू. प्रो कबड्डी लीगमधील सर्व १२ संघ तगडे आहेत. जो संघ पहिल्या पाच-सहा सामन्यांमध्ये शानदार कामगिरी करेल त्यांचा मार्ग सुखकर असेल यात शंका नाही. आताच्या घडीला आम्ही सराव आणि फिटनेसवर अधिक लक्ष केंद्रित करत आहोत", असे सुनील कुमारने सांगितले. 

सुनील कुमारने खाल्ला सर्वाधिक 'भाव'सुनील कुमार पुढे म्हणाला की, बचावपटू म्हणून मी काही वेगळी योजना केली नाही. पण, कोणत्या संघाविरुद्ध सामना असेल त्या हिशोबाने प्रशिक्षक आम्हाला मार्गदर्शन करत असतात. त्याप्रमाणे आमचा प्रवास असेल. यू मुंबाच्या संघाने सर्वाधिक महागडा भारतीय बचावपटू (१ कोटी १५ लाख) होण्याचा मान दिला. याआधी जयपूर पिंक पँथर्सच्या संघाने ९० लाख रुपयांत खरेदी केले होते. आता मी सर्वात महागडा खेळाडू ठरल्यानने खूप मेहनत करतो आहे कारण जबाबदारी मोठी आहे. संघाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी लढत राहिन.

तसेच मी गुजरात जायंट्सकडून सर्वाधिक हंगाम खेळलो आहे. पण, आता यू मुंबात असल्यामुळे या संघाकडून जास्त काळ कसे खेळता येईल त्यासाठी प्रयत्नशील असेन. प्रो कबड्डी लीगमध्ये पुन्हा एकदा परवेश भैंसवालसोबत असल्याने आणखी बळ मिळाले आहे. यू मुंबाला अव्वल स्थानी स्वप्न बाळगून मैदानात उतरू. प्रदीप नरवाल, पवन सेहरावत हे स्टार चढाईपटू असले तरी माझ्यासाठी यातील कोणतेच आव्हान नाही असे मला वाटते. कबड्डीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. प्रो कबड्डी लीगमुळे खेळाडूंना नाव, पैसा, ओळख सर्वकाही मिळत आहे... बाहेर कुठे गेल्यास सर्वजण ओळखतात याचा मनस्वी आनंद होतो, असे यू मुंबाचा नवनिर्वाचित कर्णधार सुनील कुमारने अधिक सांगितले. 

दरम्यान, प्रो कबड्डी लीगच्या अकराव्या हंगामाची सुरुवात येत्या १८ ऑक्टोबरपासून होणार आहे. अकराव्या हंगामातील सामने पुन्हा एकदा तीन वेगवेगळ्या शहरांमध्ये आयोजित करण्यात येणार आहेत. यंदाच्या पर्वाची सुरुवात हैदराबाद येथील गच्चीबाउली स्टेडियम येथून १८ ऑक्टोबरपासून होणार असून त्यानंतर या लीगचा दुसरा टप्पा नोएडा येथील नोएडा इंडोर स्टेडियम येथे १० नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. तर, तिसरा टप्पा पुणे येथे बालेवाडी बॅडमिंटन स्टेडियम या ठिकाणी ३ डिसेंबर २०२४ पासून रंगणार आहे. खरे तर प्ले ऑफच्या सामन्यांच्या तारखा आणि ठिकाण जाहीर केले जाईल. 

टॅग्स :Pro Kabaddi Leagueप्रो कबड्डी लीगU Mumbaयू मुंबा