नवी दिल्ली : पुढील महिन्यात होणा-या हिवाळी आॅलिम्पिकच्या पात्रता फेरीत सहभागी होणाºयासाठी अल्पाइन स्कीयर हिमांशू ठाकूर याने सरकारकडून मदत मागितली आहे.पात्रता फेरीच्या लढती इराणच्या दरबंदरसर येथे उद्यापासून सुरू होत आहेत आणि व्हिसाच्या त्रुटींमुळे २४ वर्षीय हिमांशू त्याच्या प्रशिक्षकासोबत जर्मनीच्या फँ कफर्ट येथे अडकला आहे. सोच्ची आॅलिम्पिकमध्ये जायंट स्लालोममध्ये ७२ व्या स्थानावर राहिलेल्या हिमांशूला दक्षिण कोरियात ९ ते २९ फेब्रुवारीदरम्यान होणा-या हिवाळी आॅलिम्पिकला पात्र ठरण्यासाठी २१ जानेवारीआधी १४0 गुण नोंदवावे लागणार आहेत.हिमांशू हा आंचल ठाकूर हिचा भाऊ आहे. तिने स्कीइंगमध्ये आंतरराष्ट्रीय पदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरण्याचा बहुमान मिळवला आहे.आंचल हिने ट्विटरद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांना टॅग करताना हिमांशूला मदत करण्याची मागणी केली आहे.ती म्हणाली, ‘‘माझा भाऊ हिमांशूजवळ सोमवारी हिवाळी आॅलिम्पिकला पात्र ठरण्याची अखेरची संधी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड व हिमाचल प्रदेश मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी हिमांशूला व्हिसासाठी मदत करावी.’’
खेळाडूने व्हिसासाठी सरकारकडून मागितली मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 6:02 AM