हैदराबाद : इंटरनॅशनल प्रीमिअर टेनिस लीग (आयपीटीएल) मध्ये स्वीत्ङरलडचा स्टार खेळाडू रॉजर फेडरर याच्या टीममध्ये समावेश असल्याचा आनंद आह़े, असे मत नुकताच डब्ल्यूटीए फायनल्स किताब आपल्या नावे करणा:या भारताची सानिया मिङर हिने व्यक्त केले आह़े
अनुभवी टेनिसपटू सानिया म्हणाली, की ही देशासाठी गौरवास्पद बाब आहे, की टेनिसमधील मोठमोठे खेळाडू भारतात येऊन खेळणार आह़े रॉजर फेडररच्या टीममध्ये माझा समावेश असल्याचे समाधान आह़े या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी मी आतूर आह़े क्रीडाप्रेमींना ही स्पर्धा नक्कीच आवडेल़’ आयपीटीएलमध्ये भारतासह 4 फ्रँचायझी पुढील महिन्यात होणा:या या स्पर्धेत सहभाग नोंदविणार आह़े फेडररव्यतिरिक्त नोव्होक जोकोविच, अँडी मरे, पीट सॅम्प्राससह अनेक स्टार खेळाडू आपले नशीब आजमावणार आह़े भारताची सानिया मिङर सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आह़े तिने ङिाम्बाब्वेच्या कारा ब्लॅकसह नुकताच डब्ल्यूटीए फायनलचा किताब आपल्या नावे केला आह़े या वर्षी तिने यूएस ओपनमध्ये मिश्र दुहेरी जेतेपद व आशियाई स्पर्धेत मिश्र दुहेरीत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आह़े (वृत्तसंस्था)
या सत्रची अखेर विजेतेपदाने करता आला, याचे समाधान आह़े कामगिरीत सातत्य राखण्याचा प्रयत्न असणार आह़े विशेष म्हणजे कारा ब्लॅकसह खेळताना अनेक स्पर्धामध्ये उत्कृष्ट खेळ करता आला़ आता आम्ही दोघी वेगवेगळ्या जोडीदारांसोबत खेळणार आहोत़ त्यामुळे तिची उणीव नक्कीच जाणवेल़
आंतरराष्ट्रीय प्रीमिअर टेनिस लीगमुळे (आयपीटीएल) टेनिस या खेळाला नवी
उंची मिळेल. टेनिस या खेळाकडे नवीन प्रशंसकांना आकर्षित करण्यात ही लीग महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
-अँडी मरे
आंतरराष्ट्रीय प्रीमिअर टेनिस लीगमध्ये (आयपीटीएल) सिंगापूर स्मॅशर्स टीमकडून खेळायला मिळेल, याचा आनंद आह़े या स्पर्धेत सवरेत्कृष्ट योगदान देण्यास सज्ज आह़े ही लीग नक्कीच क्रीडाप्रेमींच्या पसंतीस उतरेल, यात शंका नाही़
-सेरेना विल्यम्स