शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे: वाडिया कॉलेजमध्ये प्राध्यापकाच्या मुलीवर सामुहिक अत्याचार; उप जिल्हाधिकाऱ्याच्या मुलाचा धंगेकरांनी केला उल्लेख
2
"भाजपाचा एक खासदार संसदेत असेपर्यंत...", अमित शाहांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
3
"खबरदार, लाडक्या बहिणींच्या पैशांकडे नजर ठेवली तर..."; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना इशारा
4
Gold Silver Rates : विक्रमी तेजीवरून सोनं घसरलं, चांदीही झाली १७६४ रुपयांनी स्वस्त; पाहा सोन्या-चांदीचे लेटेस्ट रेट्स
5
"हेल्मेट से LBW ले सकते है"; विकेटमागून पंतची 'कॉमेंट्री'
6
"मला लढायचंच...!"; अजितदादांच्या आमदाराची भाजपविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची घोषणा
7
IND vs BAN : बांगलादेशचा 'टायगर' जखमी! जबरा फॅनला मारहाण; रुग्णालयात दाखल, नेमकं काय झालं?
8
देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील दालनाची तोडफोड; अज्ञात महिलेच्या कृत्याने खळबळ
9
KRN Heat Exchanger IPO : ग्रे मार्केटमध्ये 'हा' शेअर सुस्साट.. ₹२२० चा शेअर GMP ₹२७४ वर; तुम्ही केलंय का अप्लाय? 
10
देशाला पुढे घेऊन जाणारा प्रभावशाली नेता कोण? सैफ अली खानने घेतलं 'या' राजकीय व्यक्तीचं नाव
11
इराणी व्यक्तीची माहिती देणाऱ्याला अमेरिकेकडून १६७ कोटींचे बक्षीस, आरोपी कोण? गुन्हा काय?
12
विधानसभेची निवडणूक एका टप्प्यात घ्या, अजित पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी
13
भयंकर! १०० रुपयांवरून दोन कुटुंबात रक्तरंजित संघर्ष; लाठ्या-काठ्यांनी हल्ला, महिलेचा मृत्यू
14
IND vs BAN : आकाश दीपचा 'आत्मविश्वास'; कॅप्टन रोहितला DRS साठी केलं 'राजी'; मग जे घडलं ते लयच भारी!
15
मोदी सरकारचं कामगारांना मोठं गिफ्ट! महिन्याला मिळतील ₹26000, कसं ते समजून घ्या
16
अरे बापरे! रेल्वेच ट्रॅफिकमध्ये अडकली? कर्नाटकातील व्हिडीओ व्हायरल; रेल्वेने दिले स्पष्टीकरण
17
SL vs NZ : श्रीलंकेची रन मशीन! Kamindu Mendis ला तोड नाय; ८ सामन्यांत ५ शतकं अन् बरंच काही
18
"लादेन समाजामुळे दहशतवादी बनला", जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी ऋता आव्हाडांचे विधान
19
देशात वाढतेय Credit Card डिफॉल्टर्सची संख्या, पाहा Loan घेतल्यानंतर डिफॉल्ट केल्यास काय होतं नुकसान?
20
Pitru Paksha 2024: केवळ श्राद्धविधी केल्याने पितृदोष संपतो का? शास्त्र काय सांगते जाणून घ्या!

कोलमन भावंडांनी मिळवली पोल पोझिशन

By admin | Published: March 03, 2017 10:47 PM

भारतात पहिल्यांदाच आयोजन करण्यात आलेल्या पी-वन पॉवरबोट रेसिंगला मुंबईकरांनी मोठा प्रतिसाद दिला. मरिन ड्राइव्हच्या समुद्रकिनारी रंगलेल्या या शर्यतीदरम्यान

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 03 - भारतात पहिल्यांदाच आयोजन करण्यात आलेल्या पी-वन पॉवरबोट रेसिंगला मुंबईकरांनी मोठा प्रतिसाद दिला. मरिन ड्राइव्हच्या समुद्रकिनारी रंगलेल्या या शर्यतीदरम्यान मुंबईकरांनी समुद्री वेगाचा थरार अनुभवला. दरम्यान, बूस्टर जेट्सच्या सॅम आणि डेसी या कोलमन भावंडांनी स्पर्धेच्या पात्रता फेरीत वर्चस्व राखताना शनिवारी रंगणाऱ्या पहिल्या शर्यतीसाठी पोल पोझिशन मिळवली.ड्रायव्हर म्हणून सहभागी झालेल्या सॅमला डेसीने नेव्हीगेटर (दिशादर्शक) म्हणून उत्तम साथ दिली. या दोघांनी २:२५.७३ मिनिटांची सर्वोत्तम वेळ देत पोल पोझिशन मिळवली. विशेष म्हणजे कोलमन भावंडांना मनीआॅनमोबाइल मर्लिन्स संघाच्या जेम्स नॉर्विल आणि ख्रिस्तियन पार्सन्स-यंग यांच्याकडून कडवी लढत मिळाली. अवघ्या शतांशच्या फरकाने जेम्स - ख्रिस्तियन यांना दुसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. त्यांनी २:२५.७४ मिनिटांची वेळ नोंदवली.त्याचवेळी, पात्रता फेरीत सी. एस. संतोष आणि गौरव गिल या भारतीयांच्या कामगिरीवर सर्वांची नजर होती. बूस्टर संघाकडूनच सहभागी झालेल्या संतोषने जबरदस्त सुरुवात करताना नेव्हिगेटर मार्टिन रॉबिन्सनच्या साथीने आघाडी मिळवली होती. मात्र नंतर हळूहळू तो मागे पडू लागला. वेगात वळण घेण्याच्या प्रयत्नात लाटांमुळे संतोषच्या वेगावर परिणाम झाल्याने त्याला उत्कृष्ट वेळ नोंदवण्यात अपयश आले. संतोषने २:३१.५५ अशा वेळेसह नववे स्थान पटकावले. स्पर्धेतील दुसरा भारतीय गौरव गिलने मात्र काहीशी छाप पाडताना सातवे स्थान मिळवले. अल्ट्रा शार्क संघाच्या गौरवने नेव्हीगेटर जॉर्ज इवे याच्यासह २:३०.६० मिनिटांची वेळ नोंदवली. पहिल्या फेरीच्या अंतिम वळणावर गौरवला देखील लाटांच्या अडचणींचा सामना करावा लागला. त्याचबरोबर वेगवान वाऱ्यासह पॉवरबोटवर नियंत्रण राखणे सोपे जात नसल्याने गौरवच्या वेगावरही मोठा परिणाम झाला. तरी, शनिवारी होणाऱ्या मुख्य शर्यतीमध्ये मात्र चांगली कामगिरी करु असा विश्वास गौरवने व्यक्त केला.

आज रंगणार कोळी होड्यांची शर्यत...स्पर्धेचा दुसरा दिवस विशेष असून यावेळी दर्याचा राजा असलेला आणि मुंबईचा भूमिपुत्र म्हणून ओळखला जाणाऱ्या कोळी बांधवांची अनोखी शर्यत रंगेल. पहिल्यांदाच कोळी बांधवांच्या होड्यांची शर्यत रंगणार असून मुंबईकरांमध्ये या स्पर्धेची उत्सुकता लागली आहे. त्याचबरोबर बोट सजावटीची विशेष स्पर्धाही यावेळी रंगेल. दरम्यान, या विशेष शर्यतीसाठी सुमारे एक हजार कोळी बांधव उपस्थित राहून स्पर्धकांचा उत्साह वाढवतील, असा विश्वास दक्षिण मुंबई कोळी महासंघाचे अध्यक्ष रोहिदास कोळी यांनी व्यक्त केला आहे.‘विराट’ चषक..भारताची ऐतिहासिक युध्दनौका ‘आयएनएस विराट’ देशाच्या सेवेतून निवृत्त होत असली तरी, पी१ पॉवरबोटच्या स्पर्धेनिमित्त ही युध्दनौका अनेकांना प्रेरणा देईल. या स्पर्धेतील विजेत्यांना देण्यात येणारा चषक विराट युध्दनौकेच्या पत्र्यापासून तयार करण्यात आलेला असून भारताचे पश्चिम नौदलाचे प्रमुख व्हाईस अ‍ॅडमिरल गिरिष लुथरा यांच्या हस्ते या आकर्षक चषकाचे अनावरण करण्यात आले.