शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

उत्तर आयर्लंडला नमवून पोलंडची विजयी सलामी

By admin | Published: June 14, 2016 3:58 AM

स्टार स्ट्रायकर अर्कादियुज मिलिक याने केलेल्या एकमेव गोलाच्या जोरावर मिळवलेली आघाडी अखेरपर्यंत कायम राखताना पोलंडने उत्तर आयर्लंडला १-० असे नमवून यूरो कप फुटबॉल

लिली (फ्रान्स) : स्टार स्ट्रायकर अर्कादियुज मिलिक याने केलेल्या एकमेव गोलाच्या जोरावर मिळवलेली आघाडी अखेरपर्यंत कायम राखताना पोलंडने उत्तर आयर्लंडला १-० असे नमवून यूरो कप फुटबॉल स्पर्धेत विजयी सलामी दिली. त्याचप्रमाणे पहिल्यांदाच यूरो चषक स्पर्धेत खेळत असलेल्या उत्तर आयर्लंडची सुरुवात पराभवाने झाली. अन्य एका सामन्या जगज्जेत्या जर्मनीने दिमाखात विजयी कूच करताना युक्रेनला २-० असे पराभूत केले.पदार्पण करणाऱ्या उत्तर आयर्लंडने जबरदस्त सुरुवात करताना पोलंडला पहिल्या सत्रामध्ये चांगलेच झुंजवले. यावेळी पोलंडनेही बचावात्मक पवित्रा घेतल्याने मध्यंतराला सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. दुसऱ्या सत्रात मात्र पोलंडने आक्रमक चाली रचताना उत्तर आयर्लंडवर दडपण टाकण्याचा प्रयत्न केला. यामुळे उत्तर आयर्लंडकडून काही चुकाही झाल्या आणि त्याचा अचूक फायदा उचलताना पोलंडने ५१व्या मिनिटाला १-० अशी आघाडी घेतली. मिलिकने यावेळी उत्तर आयर्लंडच्या क्षेत्रात जोरदार मुसंडी मारताना जोरदार किक मारुन संघाला आघाडी मिळवून दिली. हीच आघाडी निर्णायक ठरविताना पोलंडने अखेरपर्यंत सामन्यावर नियंत्रण मिळवीत विजयी सलामी दिली. त्याचवेळी दुसरीकडे बलाढ्य जर्मनीने आपल्या लौकिकानुसार विजय मिळवताना युक्रेनचा २-० असा पाडाव केला. श्कोड्रान मुस्ताफी आणि बास्टियन श्वेनस्टीइगर यांचा शानदार खेळ जर्मनीच्या विजयात निर्णायक ठरला. युक्रेनचे कडवे आव्हान उत्कृष्ट सांघिक खेळाच्या जोरावर पार करताना जर्मनीने ‘सी’ ग्रुपमधून विजयी कूच केली. बदली खेळाडू म्हणून मैदानात आलेल्या मुस्ताफीने १९व्या मिनिटाला आक्रमक गोल करताना जर्मनीला १-० असे आघाडीवर नेले. यावेळी पिछाडीवर पडलेल्या युक्रेनने भक्कम बचाव करताना अखेरच्या क्षणापर्यंत जर्मनीला दुसरा गोल करण्यापासून रोखले होते. मात्र, अनुभवी श्वेनस्टीगरने ९०व्या मिनिटाला अप्रतिम गोल करून संघाची आघाडी २-० अशी करून युक्रेनच्या पराभवावर शिक्का मारला. दरम्यान, जर्मनीच्या विजयात गोलरक्षक मॅन्युअल नियुएर याचा खेळही निर्णायक ठरला. त्याने तीन शानदार गोल अडविताना युक्रेनच्या आव्हानातली हवा काढली. (वृत्तसंस्था)