आपलं क्षेत्र सोडून दुसऱ्या क्षेत्रात उडी मारणे किती महागात पडू शकते, याची प्रचिती रेबेका ब्रिगमनला आली... पॉर्न स्टार असलेल्या रेबेकानं पॉर्न फिल्ममधून मिक्स मार्शल आर्ट ( फ्री स्टाईल कुस्ती) मध्ये पदार्पण केले आणि पहिल्याच सामन्यात तिला प्रतिस्पर्धीनं धु धु धुतलं.. पॉर्न फिल्म नगरीत ओरियन स्टार या नावानं ओळखल्या जाणाऱ्या 25 नर्षीय रेबेका रविवारी मिक्स मार्शल आर्टच्या रिंगमध्ये उतरली. तिथे तिचा सामना 26 वर्षीय एलिड रीडशी झाला आणि रेबेका स्थिरस्थावर होईपर्यंत रीडनं बाजी मारली होती. रीडनं सुरुवातीपासून रेबेकावर हल्ले सुरू केली. रेबेकाला या हल्ल्यांतून बचाव करता आला नाही.
काही दिवसांपूर्वी रेबेकानं अडल्ट चित्रपटापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला होता. तेव्ही तिनं मिक्स मार्शल आर्टमध्ये करिअर करण्याचा मानस व्यक्त केला होता. पण, तिला पहिल्याच सामन्यात मार खावा लागला. रेबेका लहान असताना दोन वेळा कनिष्ठ स्तरावर मिक्स मार्शल आर्टच्या रिंगमध्ये उतरली होती. आता पुन्हा रिंगमध्ये उतरताना रेबेकानं कडवं आव्हान देण्याचा निर्धार बोलून दाखवला होता. पण, पहिल्याच फेरीत तिला गाशा गुंडाळावा लागला.
पाहा व्हिडीओ...