शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
2
Exit Poll: देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; सूचक विधान करत म्हणाले, “मतदानाचा टक्का...”
3
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
4
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
5
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
6
इलॉन मस्क यांनी पुन्हा केलं चकित, स्टारशिप यानातून अवकाशात पाठवली केळी; केला अभूतपूर्व प्रयोग
7
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
8
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
9
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
10
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
11
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
12
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
13
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
14
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
15
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
16
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
17
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
18
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
19
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
20
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार

बांग्लादेशच्या शहादत हुसेनला अटक होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2015 4:44 AM

बांगलादेशचा वेगवान गोलंदाज व त्याच्या पत्नीवर घरकामासाठी असलेल्या ११ वर्षीय मुलीला मारपीट करण्याचा आरोप असून, या दाम्पत्याला अटक करण्यासाठी प्रयत्नशील

ढाका : बांगलादेशचा वेगवान गोलंदाज व त्याच्या पत्नीवर घरकामासाठी असलेल्या ११ वर्षीय मुलीला मारपीट करण्याचा आरोप असून, या दाम्पत्याला अटक करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. पोलिसांनी सांगितले, ‘रविवारी रात्री शहादतच्या घरी छापा मारला; पण तेथे कुणीच आढळले नाही.’ एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, ‘राष्ट्रीय क्रिकेटपटू शहादत हुसेन व त्याची पत्नी मला जाच करीत असल्याची तक्रार एका मुलीने दाखल केली आहे. एका पत्रकाराला ही मुलगी शहादतच्या घराजवळ आढळली. त्याने त्या मुलीला पोलीस ठाण्यात पोहोचवले. शहादत व त्याच्या पत्नीच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर या मुलीने आजारी असल्याचे सांगितले.’अधिकारी म्हणाले, ‘आम्ही या मुलीची तक्रार दाखल केली आहे. आम्हाला तिच्या शरीरावर जखमांचे व्रण दिसून आले. त्यानंतर तिला ताबडतोब ढाका वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वन स्टाप क्राइसेस सेंटरमध्ये पाठविण्यात आले. रविवारी रात्री शहादतच्या घरी छापा मारला; पण तेथे कुणीच आढळले नाही. त्याला अटक करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.’शहादतने रविवारी मीरपूर पोलिसांकडे घरी काम करणारी मोलकरीण पळून गेल्याची तक्रार नोंदवली होती. बांगलादेशतर्फे ३८ कसोटी व ५१ वन-डे सामने खेळणारा शहादत पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेदरम्यान दुखापतग्रस्त झाल्यामुळे अलीकडेच भारत व दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकांमध्ये खेळू शकला नाही. मीरपूरमध्ये शेरे ए-बांगला नॅशनल स्टेडियमनजीकच्या भागात त्याचे निवासस्थान आहे. (वृत्तसंस्था)