शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
2
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
3
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
4
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
5
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
6
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
7
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा
8
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
9
महायुतीमधील वाद विकोपाला गेले तर बसेल फटका; मीरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर, ठाणे मतदारसंघात अंतर्गत धुसफूस
10
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
11
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
12
ऋता आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा; व्हायरल व्हिडीओवरून परांजपे यांची मागणी
13
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
14
ठाणे, वसईत २० लाखांत घर; म्हाडाच्या कोकण मंडळाचा ‘धमाका’
15
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
16
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
17
उद्योगपती मंदाना यांची १७० कोटींची मालमत्ता जप्त; बँक ऑफ बडोदाची फसवणूक केल्याचा ठपका
18
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
19
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
20
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका

भारत-इंग्लंड मालिकेत ‘डीआरएस’ची शक्यता

By admin | Published: October 15, 2016 1:36 AM

इंग्लंडविरुद्ध देशात खेळल्या जाणाऱ्या आगामी मालिकेत बीसीसीआय पंचांच्या निर्णयाची समीक्षा प्रणालीचा (डीआरएस) वापर करण्याची दाट शक्यता

नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्ध देशात खेळल्या जाणाऱ्या आगामी मालिकेत बीसीसीआय पंचांच्या निर्णयाची समीक्षा प्रणालीचा (डीआरएस) वापर करण्याची दाट शक्यता आहे. यावर गंभीर विचार होत असल्याने बोर्डाचे हे पाऊल आपल्याच निर्णयापासून फारकत घेतल्याचे मानले जात आहे.डीआरएसचा वापर झाल्यास भारत द्विपक्षीय मालिकेत पहिल्यांदा अशा प्रकारच्या तंत्राचा वापर करणारा देश ठरेल. मागच्यावेळी आयसीसी विश्वचषक २०११ च्यावेळी या तंत्राचा भारतात वापर झाला होता. आयसीसीच्या प्रवक्त्याने या संदर्भात माहिती देताना सांगितले की, आयसीसीचे महाव्यवस्थापक ज्योफ अलार्डिस हे तांत्रिक साहाय्य उपलब्ध करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांची बीसीसीआय अधिकारी आणि कोच अनिल कुंबळे यांच्यासोबत भेट घालून देतील. पुढील आठवड्यात ही चर्चा होईल. यावेळी डीआरएस सोबतच एमआयटी अभियंत्यांनी विकसित केलेल्या हॉकआय बॉल टेकिंग टेक्नॉलॉजीसंदर्भातही चर्चा होईल. कुंबळे हे आयसीसी क्रिकेट समितीचे अध्यक्ष असून, मागच्यावर्षी त्यांनी हॉक आय टेक्नॉलॉजी मॉनिटररिंग लेबॉरेटरीचा दौरा केला होता. (वृत्तसंस्था)