शहरं
Join us  
Trending Stories
1
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
2
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
3
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
4
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
5
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
6
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
8
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
9
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
10
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योग गुरूंनीच सांगितलं...
11
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
12
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
13
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
14
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
15
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
16
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
17
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
19
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
20
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा

हॉकी इंडियाकडून संभाव्य संघ जाहीर

By admin | Published: March 10, 2017 11:46 PM

हॉकी इंडियाने राष्ट्रीय शिबिरासाठी संभाव्य ३३ खेळाडूंची नावे शुक्रवारी जाहीर केली. बेंगळुरू येथील साई केंद्रात १४ मार्चपासून शिबिराला सुरुवात होणार आहे.

नवी दिल्ली : हॉकी इंडियाने राष्ट्रीय शिबिरासाठी संभाव्य ३३ खेळाडूंची नावे शुक्रवारी जाहीर केली. बेंगळुरू येथील साई केंद्रात १४ मार्चपासून शिबिराला सुरुवात होणार आहे. मुख्य कोच रोलॅन्ट ओल्टमन्स यांच्या मार्गदर्शनात होणाऱ्या शिबिरात ज्युनियर विश्वचषक विजेत्या संघातील ११ चेहऱ्यांचा समावेश आहे. नुकत्याच संपलेल्या हॉकी इंडिया लीगमध्ये ज्युनियर खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली होती. संदीपसिंग, हरजितसिंग, हरमनप्रितसिंग आणि विकास दहिया हे आधीपासून सिनियर संघात खेळले आहेत. बचावफळीतील दिप्तान तिर्की आणि गुरिंदरसिंग, मिडफिल्डर सुमित शर्मा, मनप्रित आणि सिमरणजीतसिंग, आक्रमक फळीतील गुरजांतसिंग हे नवे चेहरे आहेत. संभाव्य संघातून एप्रिल महिन्यात आयोजित सुल्तान अझलान शाह चषक स्पर्धेसाठी तसेच जूनमध्ये आयोजित पुरुष हॉकी विश्व लीगच्या अंतिम फेरीसाठी संघ निवडला जाईल. ही स्पर्धा लंडनमध्ये होणार आहे. मुंबईचा २० वर्षांचा गोलकिपर सूरज करकेरा याला सिनियर शिबिरासाठी बोलावणे आले आहे. तो मागच्यावर्षी व्हेलेसिया येथे झालेल्या चार देशांच्या आंतरराष्ट्रीय ज्युनियर हॉकी स्पर्धेत भारतीय संघात खेळला. (वृत्तसंस्था)राष्ट्रीय शिबिरासाठी संभाव्य हॉकीपटूगोलकीपर : आकाश चिकटे, पीआर श्रीजेश, विकास दहिया, सूरज करकेरा बचावफळी : दिप्सान टिर्की, परदीप मोर,वीरेंद्र लाक्रा, कोथाजीतसिंग, सुरेंदर कुमार, रुपिंदरपालसिंग, हरमनप्रीतसिंग, जसजीतसिंग कुलार, गुरिंदरसिंग, अमित रोहिदास . मधली फळी : चिंगलेनसानासिंग, एसके उथप्पा, सुमित, सतबीरसिंग, सरदारसिंग, मनप्रीतसिंग, हरजीतसिंग, नीलकांत शर्मा, मनप्रीत, सिमरनजीतसिंग, आर्क : रमनदीप सिंह, एसवी सुनील, तलविंदर सिंह, मंदीप सिंह, अफ्फान यूसुफ, निक्किन थिमैया, गुरजांत सिंह, आकाशदीप सिंह, ललित उपाध्याय