आपिया : युवा राष्ट्रकुल स्पर्धेत तिरंदाजीमध्ये महिलांच्या गटात भारताच्या प्राची सिंगने रिकर्व्ह प्रकारात आणि टेनिसच्या मिश्र दुहेरीत शशिकुमार मुकुंद व धृती टी. वेणुगोपाल यांनी धडाकेबाज खेळ करून सुवर्णपदक जिंकले. भारतीय संघाने एकूण १७ पदकांसह पदकतालिकेत सहावे स्थान पटकावले आहे.महिलांच्या रिकर्व्ह प्रकारात प्राचीने अंतिम सामन्यात बांगलादेशाच्या नंदिनी खान शोपनाचे आव्हान परतवून लावत सुवर्णवेध घेतला. टेनिसच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात शशिकुमार-धृती जोडीला पहिल्या सेटमध्ये स्कॉटलंडच्या लुसी अदा एम.-इवेन लम्सडेन यांनी कडवी टक्कर दिली. टायब्रेकमध्ये गेलेल्या या सेटमध्ये बाजी मारल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये आक्रमक खेळ करून भारतीय जोडीने स्कॉटलंडच्या खेळाडूंना ७-६(४), ६-३ असे नमवले आणि भारताच्या खात्यात आणखी एका सुवर्णपदकाची भर टाकली. मुष्टियोद्धा गौरव सोळंकी, तिरंदाज निशांत कुमावर व व्ही. सेंथील कुमार-हर्षित जवांडा (स्क्वॉश) यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. मुष्टियोद्धा एल. भीमचंद्र आणि प्रयाग चौहान (६४ किलो) यांनी कांस्यपदक पटकावले. (वृत्तसंस्था)बॉक्सिंगमध्ये ‘सिल्वर’ पंच : बॉक्सिंगमध्ये गौरव सोळंकीलो ५२ किलोगटाच्या अंतिम लढतीत आॅस्टे्रलियाच्या जॅक बोवेनविरुद्ध ०-३ अशी हार पत्करावी लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. दरम्यान, याआधी लेइचोंबाम भीमचंद (४९ किलो) आणि प्रयाग चौहान (६४ किलो) यांना उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. बॉक्सिंगमध्ये भारताने एकूण तीन पदकांची कमाई केली. स्क्वॉशमध्येही रौप्य यश- आशियाई स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्क्वॉश स्पर्धेत भारतीयांची कामगिरी उल्लेखनीय होत आहे. त्यात नवोदितांनी लक्षवेधी कामगिरी केली. - युवा राष्ट्रकुल स्पर्धेतदेखील भारतीयांनी मिश्र दुहेरीच्या गटात रौप्यपदक जिंकताना आपली छाप पाडली. - मलेशियाच्या अव्वल मानांकित इयेन यो नेग-आंद्रिया जिया क्वी ली या जोडीविरुद्ध एकतर्फी झालेल्या लढतीत भारतीयांचा ६-११, ५-११ असा पराभव झाला.
प्राची, शशिकुमार-वेणुगोपाल यांना सुवर्ण
By admin | Published: September 11, 2015 2:10 AM