शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

प्रज्ञानला पुनरागमनाचे वेध

By admin | Published: September 12, 2015 3:21 AM

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला निरोप देणाऱ्या कसोटीत खेळल्यानंतर कसोटी क्रिकेटमधून डच्चू मिळालेला डावखुरा फिरकी गोलंदाज प्रज्ञान ओझा

नवी दिल्ली : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला निरोप देणाऱ्या कसोटीत खेळल्यानंतर कसोटी क्रिकेटमधून डच्चू मिळालेला डावखुरा फिरकी गोलंदाज प्रज्ञान ओझा याला द. आफ्रिकेविरुद्ध सुरू होत असलेल्या गांधी - मंडेला कसोटी मालिकेसाठी जाहीर झालेल्या भारताच्या संभाव्य ३० खेळाडूंमध्ये स्थान मिळाले. या फिरकीपटूची नजर टीम इंडियात पुनरागमन करण्याकडे असेल. बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार सिनियर क्रिकेट निवड समितीने द. आफ्रिकेविरुद्ध मालिकेसाठी संभाव्य ३० खेळाडू निवडले. या खेळाडूंचे शिबिर २१ ते २७ सप्टेंबर या कालावधीत बेंगळुरु येथे सुरू होत आहे. संभाव्य खेळाडूंमध्ये प्रज्ञानचे नाव लक्षवेधी आहे कारण तो नोव्हेंबर २०१३ मध्ये सचिनला निरोप देणाऱ्या सामन्यात खेळला होता. त्याने दहा गडी बाद करीत सामनावीराचा पुरस्कार पटकविला होता. त्यानंतर गतवर्षी त्याची गोलंदाजी शैली संशयास्पद ठरविण्यात आली. या धक्क्यातून सावरल्यानंतर संभाव्य खेळाडूंमध्ये स्थान मिळणे ही प्रज्ञानसाठी मोठी बाब ठरते. संभाव्य खेळाडूंमध्ये अन्य दोन डावखुरे गोलंदाज रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांचे देखील नाव आहे. माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी पटेलबद्दल बोलताना त्याच्यात कसोटी क्रिकेट खेळण्याची क्षमता नसल्याचे विधान केले होते. पटेलने मात्र द. आफ्रिकेच्या अ संघाविरुद्ध अनधिकृत कसोटीत चेंडू आणि बॅटने उल्लेखनीय कामगिरी बजावली. लंकेविरुद्ध अखेरच्या कसोटीत अंतिम एकादश बाहेर राहिलेला अनुभवी आॅफ स्पिनर हरभजनसिंग हा देखील संभाव्य खेळाडूंमध्ये आहे. जखमी होऊन संघाबाहेर झालेला वेगवान मोहम्मद शमी याला देखील या यादीत स्थान देण्यात आले. याशिवाय वेगवान उमेश यादव, मोहित शर्मा आणि धवल कुलकर्णी, लेग स्पिनर कर्ण शर्मा, युवा फलंदाज केदार जाधव व मनीष पांडे यांच्याही नावाचा समावेश करण्यात आला आहे. भारताने लंकेला त्यांच्याच भूमिक २-१ ने पराभूत करीत २२ वर्षानंतर कसोटी मालिका जिंकली. द. आफ्रिकेचा भारत दौरा २ आॅक्टोबर ते ९ डिसेंबर या कालावधीत होणार असून चार कसोटी, पाच वन डे आणि तीन टी-२० सामन्यांचे आयोजन होणार आहे. (वृत्तसंस्था)संभाव्य खेळाडू : महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, शिखर धवन, मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, स्टुअर्ट बिन्नी, रिद्धिमान साहा, नमन ओझा, रविचंद्रन अश्विन, अमित मिश्रा, हरभजनसिंग, ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, वरुण अ‍ॅरोन, करुण नायर, सुरेश रैना, मोहम्मद शमी, अक्षर पटेल, प्रज्ञान ओझा, रवींद्र जडेजा, मोहित शर्मा, कर्ण शर्मा, अंबाती रायुडू, धवल कुलकर्णी, केदार जाधव आणि मनीष पांडे.