अकरा वर्ष ओल्ड ट्रॉफोर्डवर खेळल्यानंतर मायकल कॅर्रीक याने मान्य केले की, यंदाचे मोसम मँचेस्टर युनायटेडसाठी संमिश्र राहिले; पण त्याचवेळी मॅनेजर जोस मुरिन्हो यांच्या मार्गदर्शनाखाली संघाला अव्वल चार स्थानांमध्ये जागा मिळवून देऊ शकतो, असा विश्वासही मायकलने व्यक्त केला आहे. यंदाच्या प्रीमियर लीगमध्ये वरखाली झालेल्या कामगिरीमुळे सध्या गुणतालिकेत एमयू संघ पाचव्या स्थानी आहे. अजून संघाला ४ सामने खेळायचे असून, येत्या रविवारी आर्सेनालविरुद्ध होणाऱ्या हायव्होल्टेज सामन्यासाठी एमयू सज्ज झाले आहे. दरम्यान, स्पेनमध्ये विश्रांती देण्यात आल्यानंतर अमिरातमध्ये खेळण्यास सज्ज असलेल्या मायकलच्या मते एमयू संघ पुर्ण तयारीनिशी सज्ज असून आर्सेनालविरुध्द संघ समतोल आहे. या महत्त्वपूर्ण सामन्यासाठी त्याच्याशी केलेली बातचीत...
मायकल, प्रीमियर लीगमधील ही वेळ ‘एमयू’साठी अत्यंत महत्त्वाची आहे. आर्सेनालनंतर तुम्हाला टॉटनहॅमविरुध्दही खेळायचे आहे. हे संघासाठी किती आव्हानात्मक असेल?- हे काहिसे कठिण दिसत आहे, पण आम्ही त्याकडे आव्हान म्हणून पाहत नाही. तुम्हाला याकडे एक संधी म्हणून पाहण्याची गरज असून आम्ही या सामन्यांकडे सकारात्मकपणे सामोरे जाऊ. संघासाठी गुण कमावणे हे आमच्या हातात आहे. जर निकाल आमच्या बाजूने लागला, तर मोसमाची सांगता चांगल्या पध्दतीने करू शकतो.
म्हणजे तुझ्यावर सध्या कोणत्याही प्रकारचा दबाव नाही आहे का?- नक्कीच नाही. अशा महत्त्वपूर्ण सामन्यांसाठी तुम्हाला सकारात्मक राहावे लागते. यंदाच्या सत्राचा शेवट चांगल्याप्रकारे करण्याचेच आमचे लक्ष्य आहे. आम्ही त्याद्ृष्टीने मेहनत करीत असून, जास्तीत जास्त वरचे स्थान गाठण्याचा आमचा प्रयत्न आहे.
अव्वल चारमध्ये येण्यासाठी तुम्हाला प्रत्येक सामना जिंकावा लागेल. याबाबत काय सांगशील?- खरं सांगायचं झाल्यास, आघाडीच्या संघांना गाठण्याइतपत आवश्यक सामने आमच्याकडे शल्लक नाहीत. मात्र, पुढे आगेकूच करण्याइतपत संधी आमच्याकडे असून आमच्यासाठी प्रत्येक सामना मोठा आहे. (टीसीएम)त्यामुळे सातत्यपुर्ण कामगिरी करुन जिंकण्याचा आमचा प्रयत्न राहिल.
अनेक सामन्यात तुम्ही वर्चस्व गाजवले पण विजयी तीन गुण मिळवण्यात अपयशी ठरले. हे यंदा सर्वात निराशाजनक ठरले आहे का?- हो नक्कीच, खास करुन घरच्या मैदानावर. हे खूप निराशाजनक आहे. फॉर्मच्या बाबतीत संघाची कामगिरी जबरदस्त झाली. मला वाटते गेल्या काही सामन्यांपासून आम्ही चांगले खेळत आहोत. पण घरच्या मैदानावर आम्ही अपेक्षित निकाल नोंदवण्यात अपयशी ठरलो. चॅम्पियन्स लीगसाठी पात्र ठरण्याकरता एमयूकडे दोन मार्ग आहेत. एक म्हणजे प्रीमियर लीगच्या अव्वल चार संघामध्ये येणे आणि
दुसरा मार्ग, युरोपा लीगचे जेतेपद पटकावणे. याविषयी काय सांगशील?- मँचेस्टर युनायटेड सारख्या संघाला प्रत्येक स्पर्धेत सामने जिंकणे अनिवार्य असते. आम्ही प्रत्येक विभागामध्ये आक्रमक खेळ केला आहे. चाहत्यांच्या मते युरोपा लीग सर्वोत्तम मार्ग असेल, पण आम्हाला ते वाटत नाही. आम्हाला प्रीमियर लीगमध्ये चांगला मार्ग दिसत असून आम्ही त्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. आमच्यासाठी हा मार्ग कठीण आहे, पण आम्ही यासाठी सज्ज आहोत.