शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

तयारी कसोटीची

By admin | Published: October 29, 2015 10:31 PM

भारताला भारतात टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत नमविल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघ भारतीय दौऱ्यातील मुख्य मालिकेसाठी म्हणजे

मुंबई : भारताला भारतात टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत नमविल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघ भारतीय दौऱ्यातील मुख्य मालिकेसाठी म्हणजे, कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. मुंबईत शुक्रवार-शनिवार या भारत अध्यक्षीय संघाविरुद्ध दोनदिवसीय सराव सामन्याने दक्षिण आफ्रिका आपली दावेदारी मजबूत करेल.ब्रेबॉन स्टेडियम येथे ३० व ३१ आॅक्टोबरला रंगणाऱ्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ कसोटी मालिकेसाठी सज्ज होण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. या सामन्यात अजूनही आपल्या लौकिकाप्रमाणे कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या हाशीम आमला याच्यावर सर्वांच्या नजरा असतील.विशेष म्हणजे भारत व द. आफ्रिकामध्ये पहिल्यांदाच चार सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. भारतात आतापर्यंत उभय संघांनी १२ कसोटी खेळल्या असून त्यात दोन्ही संघांनी प्रत्येकी ५ वेळा बाजी मारली आहे. तर २ सामने अनिर्णित राहिले आहेत. हाशिम आमलाच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिका संघाला सध्या दुखापतींचा सामना करावा लागत आहे. प्रमुख गोलंदाज मॉर्नी मॉर्कल आणि अष्टपैलू जेपी ड्युमिनी हे दोघेही एकदिवसीय मालिकेत जखमी झाल्याने त्यांना संघाबाहेर बसावे लागले. शिवाय, कसोटी मालिकेत यांच्या अनुपस्थितीचाही फटका बसण्याची शक्यता असल्याने या दोघांच्या तंदुरुस्तीकडे द. आफ्रिका संघाचे लक्ष लागले आहे. दुसऱ्या बाजूला भारत अध्यक्षीय संघातून कर्णधार चेतेश्वर पुजारा सर्वांचे लक्ष वेधून घेण्यास सज्ज असेल. तसेच, कसोटी मालिकेआधी द. आफ्रिकेविरुद्ध स्वत:ला सिद्ध करण्यासाठी पुजाराकडे ही लढत सुवर्णसंधी आहे, त्याचबरोबर लोकेश राहुल आणि यष्टिरक्षक - फलंदाज नमन ओझा यांच्या कामगिरीवरही निवड समितीचे बारीक लक्ष असेल. सध्या भारतीय कसोटी संघात यष्टिरक्षकाची जबाबदारी वृद्धीमान साहाकडे असून, सराव सामन्यातून स्वत:ची छाप पाडण्यास ओझा प्रयत्नशील असेल.