नवी दिल्ली : भारताची दुहेरीतील अव्वल बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा हिने सध्या आपण फि टनेसवर विशेष भर देत असल्याचे म्हटले आहे़ अश्विनी पोनप्पासोबत प्रभावी कामगिरी होत आहे, याचे समाधान असल्याचेही तिने सांगितले आहे़ज्वाला पुढे म्हणाली, मी सध्या पूर्णपणे फिट आहे़ आता हाच फिटनेस पुढील स्पर्धांमध्ये कायम राखण्यासाठी प्रयत्नशील आहे़ सध्याच्या खेळावर पूर्णपणे समाधानी असून, फिटनेसचा स्तर २०१६च्या रिओ आॅलिम्पिकपर्यंत कायम राहावा, अशी इच्छाही तिने व्यक्त केली़ ज्वालाने सांगितले की, अश्विनीसह फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेत जागतिक क्रमवारीतील ११ व्या स्थानावर असलेल्या जोडीला धूळ चारली होती़ आमचे पुढील लक्ष्य हाँगकाँग तसेच मकाऊ ओपनमध्ये उत्कृष्ट खेळ करण्याचे आहे़ त्यात आम्ही नक्कीच यशस्वी होऊ, असा विश्वासही तिने व्यक्त केला़फ्रेंच ओपनमध्ये सहभाग घेतल्यानंतर मायदेशी परतलेली ज्वाला म्हणाली, आम्ही स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली होती़ ही निराशाजनक कामगिरी नाही़ या स्पर्धेत भारताच्या अन्य खेळाडूंनीही चांगली कामगिरी केली़ विशेष म्हणजे, एका स्पर्धेतील कामगिरीवरून कुणीही खेळाडूंचे आकलन करू शकत नाही, असेही ज्वाला म्हणाली़२०१६ मध्ये रिओ आॅलिम्पिक होणार असल्यामुळे सर्व खेळाडूंसाठी २०१५ हे वर्ष महत्त्वाचे आहे़ सर्व खेळाडूंना येत्या वर्षात होणाऱ्या स्पर्धांमध्ये कठीण मेहनत करावी लागणार आहे़ सध्या खेळात कोणत्याही उणिवा नाहीत़ त्यामुळे केवळ फिटनेस कायम राखणे हे माझे लक्ष्य आहे, असेही ज्वालाने सांगितले़ज्वाला म्हणाली, दुखापतीमुळे आशियाई स्पर्धेत सहभाग घेता आला नव्हता याचा खेद आहे़ या स्पर्धेत महिला टीमने उत्कृष्ट कामगिरी करून कांस्यपदकाची कमाई केली होती, याबद्दल टीम कौतुकास पात्र आहे़ (वृत्तसंस्था)
सध्या फिटनेसवर विशेष भर : ज्वाला
By admin | Published: October 27, 2014 1:57 AM