- पारुपल्ली कश्यप लिहितातसिंधूकडे गमविण्यासारखे काहीही नसल्याने उपांत्य सामन्यात याच लयीने खेळ करायला हवा. नाजोमी ओकुहारा हिच्यापेक्षा कमी रँकिंगची खेळाडू असल्याचा सिंधूला लाभ होईल. नाजोमी आॅल इंग्लंड आणि दुबई ओपन चॅम्पियन आहे. अशावेळी ज्या खेळाच्या भरवशावर इथपर्यंत वाटचाल केली तसाच खेळ करण्याची सिंधूला गरज असेल. सकारात्मक वृत्ती जोपासणे हे देखील कठीण नाही.रिओमध्ये कोर्टवर सिंधू पूर्णपणे फिट दिसत आहे. तिची देहबोली देखील सकारात्मक आहेच. खेळ आधीच्या तुलनेत अधिकच बहरलेला दिसतो. दीर्घ रॅली मारून गुण वसूल करण्याची पद्धत सिंधूच्या खेळातील ताकद बनली. त्यामुळे सेमीफायनलला सामोरे जाण्याआधी विश्रांती घेत ताजेतवाने होणे गरजेचे आहे. मला मनातून असे वाटते की नाजोमीला सामन्यात थोडे झुकते माप असेल. सिंधूच्या तुलनेत ती सातत्याने स्पर्धांमध्ये उपांत्य सामने खेळत आली. तिला हे दडपण झुगारून लावणे चांगले जमते. तरीही उपांत्य लढतीत दोन्ही खेळाडूंवर अतिरिक्त दडपण असेल यात शंका नाही. या सामन्यात मिळालेला विजय आॅलिम्पिक पदक निश्चित करणारा असेल. बॅडमिंटनमध्ये कांस्यपदकासाठी सामना होणे मला कुठेतरी खटकतो. अनेक खेळ असे आहेत की ज्यात उपांत्यफेरी निश्चित झाल्यास पदक निश्चित होते. बॅडमिंटन खेळाडूंना मात्र पदकासाठी सलग सात दिवस कोर्टवर राहावे लागले.सायनाचे रिओ आॅलिम्पिकबाहेर पडणे दुर्दैवी ठरले. आॅलिम्पिकपूर्वी मी तिच्यासोबत सराव करीत होतो. त्यामुळे मला अधिकच वाईट वाटले. तिच्या गुडघ्याला त्रास होता. दुखणे उमळल्याने त्रास आणखी वाढला. रिओत वेदनामुक्त होऊन तिला खेळायचे होते. त्यासाठी सायनाने इंजेक्शन घेतले. त्याचा फारसा परिणाम मात्र झाला नाही. तिचे दुखणे चुकीच्या वेळी उमळले. आज एक भारतीय बॅडमिंटनपटू रिओमध्ये खेळताना दिसणार नाही पण त्याच्या नावाचा उल्लेख येथेही होईल. पुलेला गोपीचंद हे त्या खेळाडूचे नाव. गोपी सरांमुळेच हा बदल शक्य झाला. सायनाने गेल्या दहा वर्षांत सातत्यपूर्ण कामगिरी केली. जगातील अव्वल पाच खेळाडूंमध्ये कायम राहिली. यामुळे आम्हा सर्वांचा आत्मविश्वास द्विगुणित झाला. गोपी सरांच्या मेहनतीचे फळ सर्वांना पहायला मिळत आहे. (टीसीएम)
सिंधू-नोझोमीवर उपांत्य लढतीचे दडपण
By admin | Published: August 18, 2016 1:27 AM