शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
5
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
6
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
8
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
9
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
10
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
11
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
12
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
13
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
15
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
16
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
17
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
18
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
19
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस

माजी स्टार्सची प्रतिष्ठा पणाला!

By admin | Published: April 08, 2016 3:26 AM

इंडियन प्रीमियर लीगच्या नवव्या सत्राची धडाकेबाज सुरुवात उद्या शनिवारपासून होत आहे. दहा शहरांमध्ये ५९ सामन्यांचे यंदा आयोजन होणार असून, यात अनुभवी खेळाडूंना प्रतिष्ठा जपण्याचे आव्हान असेल

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या नवव्या सत्राची धडाकेबाज सुरुवात उद्या शनिवारपासून होत आहे. दहा शहरांमध्ये ५९ सामन्यांचे यंदा आयोजन होणार असून, यात अनुभवी खेळाडूंना प्रतिष्ठा जपण्याचे आव्हान असेल, तर युवा खेळाडूंकडे करियरला उभारी देण्याची संधी राहील. या स्पर्धेच्या रूपाने पुढील सात आठवडे क्रिकेट आणि मनोरंजनाची मेजवानी अनुभवायला मिळणार आहे.चेन्नई सुपरकिंग्स हे नाव सध्यातरी इतिहासजमा झाले असल्याने महेंद्रसिंह धोनी पिवळ्या रंगाच्या टी शर्टमध्ये दिसणार नाही. यंदा पुणे सुपरजायंट्स आणि गुजरात लायन्स हे दोन नवे संघ पदार्पण करतील. धोनी हा टी-२० क्रिकेटचा चाणाक्ष कर्णधार मानला जातो. विराट कोहली आक्रमकतेसाठी प्रख्यात आहे. सध्या तो फॉर्ममध्ये आहे. त्याचा हा फॉर्म रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूसाठी कायम राहावा, अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. याच संघात ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलियर्सदेखील आहेत. गत चॅम्पियन मुंबई इंडियन्स संघात अधिक बदल झालेले नाहीत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील या संघात इंग्लंडचा जोस बटलर आहे. डेअरडेव्हिल्सकडे टी-२० चा नवा स्टार कार्लोस ब्रेथवेट आहे. त्याने टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अखेरच्या षटकांत चार चेंडूंवर सलग चार षटकार ठोकून विंडीजला विजेतेपद मिळवून दिले. झहीर खानकडे या संघाचे नेतृत्व असून, राहुल द्रविडसारखा मेंटर संघाला लाभला आहे. शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्सला ईडन गार्डनवर मोठा पाठिंबा लाभेल; पण प्रश्न हा की सुनील नारायण नव्याने गोलंदाजीत जादू करू शकेल. जॅक कॅलिस कोच असल्याने केकेआरचा कर्णधार गौतम गंभीर याच्यावर दडपण वाढले. सनराइझर्स हैदराबादकडे डेव्हिड वॉर्नर आणि गोलंदाजीत आशिष नेहरा तसेच मुस्तफिजूर रहमान आहेत. किंग्ज इलेव्हन पंजाबकडे डेव्हिड मिलर आणि ग्लेन मॅक्सवेल आहेत, पण मिशेल जॉन्सनच्या अनुपस्थितीत त्यांचा गोलंदाजी मारा अर्धवट वाटतो.> युवा खेळाडूंच्या करिअरला उभारी देण्याची संधीचेन्नई व राजस्थान रॉयल्सवर दोन वर्षांची बंदी कायम आहे. या संघाने आयपीएलवर जादू कायम केली होती. या संघाचा माजी दिग्गज धोनीला आता विजयाची मोट बांधावी लागणार आहे. त्याच्या हाताशी फाफ डुप्लेसिस आणि रविचंद्रन आश्विन हे आहेत. सुरेश रैना आणि रवींद्र जडेजा हे विश्वासू खेळाडू सध्या त्याच्या संघात नाहीत. दिल्ली संघात एल्बी मोर्केल, तर ड्वेन ब्राव्हो लॉयन्सकडे आहे. धोनीकडे केविन पीटरसनच्या रूपात आक्रमक फलंदाज आहे. लॉयन्सचा कर्णधार रैनाकडे ब्रेंडन मॅक्यूलम तसेच ड्वेन स्मिथ यांची ताकद असेल. कोहलीची नजर आता आयपीएल जेतेपदावर आहे. कोहली, गेल, डिव्हिलियर्स यांच्या रूपाने बेंगळुरूकडे सर्वांत धोकादायक फलंदाजांचे त्रिूकट आहे. याशिवाय शेन वॉटसन, सॅम्युअल बद्री, मधल्या फळीत सर्फराज खान आणि केदार जाधव असतील. ब्रेथवेटमुळे डेअरडेव्हिल्स संघाला वलय प्राप्त झाले आहे. गोलंदाजीची धुरा मोहम्मद शमीकडे असेल, याशिवाय मागच्या आयपीएलचा हिरो श्रेयस अय्यर, करुण नायर, क्विंटन डिकॉक व ऋषभ पंत यांचा समावेश आहे. केकेआरकडे मनीष पांडे, रॉबिन उथप्पा, शकिब अल हसन आणि दीर्घकाळापासून संघर्ष करीत असलेला युसूफ पठाण आदींचा समावेश आहे. स्पर्धेत सलामीची लढत गत चॅम्पियन मुंबई इंडियन्सविरुद्ध पुणे सुपरजायंट्स यांच्यात होणार आहे. प्ले आॅफ सामने २४, २५ आणि २७ मे रोजी तसेच अंतिम सामना २९ मे रोजी खेळविला जाईल.