ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ४ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझीलच्या रिओमध्ये होणाºया आगामी ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार असलेल्या खेळाडूंची सोमवारी भेट घेतली व त्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
मानेकशा सेंटरमध्ये झालेल्या या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंसोबत बातचीत केली आणि ५ ते २१ आॅगस्ट या कालावधीत रंगणाºया क्रीडा महाकुंभासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी क्रीडामंत्री जितेंद्र सिंग, क्रीडा सचिव राजीव यादव, अखिल भारतीय क्रीडा परिषदेचे अध्यक्ष विजय कुमार मल्होत्रा, भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष एन. रामचंद्रन, महासचिव राजीव मेहता, हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरिंदर बत्रा आणि सचिव मुश्ताक मोहम्मद प्रामुख्याने उपस्थित होते.
या अनौपचारिक भेटीमध्ये पंतप्रधानांनी खेळाडूंसोबत रिओच्या तयारीबाबत बातचीत केली. यावेळी अनेक खेळाडूंनी पंतप्रधानांसोबत सेल्फी घेण्याची हौस भागवली. दरम्यान, अनेक खेळाडू सरावासाठी विदेशात असल्यामुळे त्यांना या कार्यक्रमात सहभागी होता आले नाही. भारताचे आॅलिम्पिकमध्ये प्रथमच १०० पेक्षा अधिक खेळाडूंचे पथक सहभागी होणार आहे.