शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

PKL Auction 2024 : प्रो कबड्डी लीगचा ऐतिहासिक लिलाव! शुभम-अजिंक्यला मिळाले मेहनतीचे फळ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 12:30 PM

pro kabaddi auction 2024 news in marathi : प्रो कबड्डी लीग आपल्या अकराव्या हंगामाकडे कूच करत आहे. 

pro kabaddi auction 2024 : प्रो कबड्डी लीग आपल्या अकराव्या हंगामाकडे कूच करत आहे. १५ आणि १६ ऑगस्ट रोजी आगामी पर्वासाठी लिलाव प्रक्रिया पार पडली. दोन दिवसांच्या या लिलावात एकूण ११८ खेळाडूंची खरेदी झाली. काहींना लॉटरी लागली तर काहींना त्यांच्या पदानुसार भाव मिळाला नाही. (Pro Kabaddi League 11th Season Auction) विशेष बाब म्हणजे प्रो कबड्डी लीगच्या इतिहासात प्रथमच आठ खेळाडूंनी १ कोटी रूपयांची मर्यादा ओलांडली. तमिळ थलायवाजचा सचिन (२.१५कोटी) हा सर्वात महागडा खेळाडू ठरला. मराठमोळ्या अजिंक्य पवारवर देखील पैशांचा वर्षाव झाला. तर, हरियाणा स्टीलर्सचा मोहंमद रेझा शादलुई चियानेह (२.०७ कोटी) सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला आहे. (Ajinkya Pawar pkl 2024 auction)

अजिंक्य पवारला बेंगलुरू बुल्सच्या फ्रँचायझीने १.१० कोटी रूपयांत आपल्या ताफ्यात घेतले. अजिंक्यला आपल्या संघाचा भाग बनवण्यासाठी इतरही फ्रँचायझींनी संघर्ष केला. तेलुगू टायटन्सने अजिंक्यला खरेदी करण्यासाठी प्रथम बोली लावली होती. बोली लागत गेली पण अखेर बेंगलुरूने मोठी रक्कम देऊन त्याला आपल्या संघाचा भाग बनवले. मला लिलावात चांगली रक्कम मिळाल्याने माझ्यासह माझे कुटुंबीय खूप आनंदी आहेत. मला बेंगलुरू बुल्सने खरेदी केले याचा आनंद आहे. त्यांची फ्रँचायझी आणि प्रशिक्षक रनधीर सर यांचा मी आभारी आहे, असे अजिंक्यने सांगितले. तो मूळचा महाराष्ट्रातील आहे. 

शुभम शिंदे झाला लखपतीप्रो कबड्डी लीगच्या लिलावात आणखी एका मराठमोळ्या खेळाडूला लॉटरी लागली. बचावपटू शुभम शिंदे त्याची मूळ किंमत २० लाख रूपयांसह लिलावाच्या रिंगणात होता. पाटणा पायरेट्सने त्याला ७० लाख रूपये देऊन आपल्या ताफ्यात घेतले. १७ फेब्रुवारी १९९९ साली जन्मलेला शुभम महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील आहे.  दरम्यान, डुबकी किंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रदीम नरवालबद्दल वेगळे काही सांगण्याची गरज नाही. पटनाच्या संघाकडून खेळताना त्याने खूप प्रसिद्धी मिळवली. पण, आगामी हंगामात तो बंगळुरु बुल्सकडून खेळताना दिसेल. भारताच्या या स्टार खेळाडूसाठी ७० लाख रुपयांची बोली लागली. सामन्याला एकहाती कलाटणी देण्याची क्षमता असणारा हा खेळाडू कोट्यवधीच्या क्लबला मुकल्याने कबड्डी शौकिनांनाही धक्का बसला. 

टॅग्स :Pro Kabaddi Leagueप्रो कबड्डी लीगKabaddiकबड्डी