रोहित नाईक / ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23- आगामी प्रो कबड्डी लीगच्या पाचव्या मोसमासाठी झालेल्या लिलावाच्या अंतिम दुसºया दिवशी चढाईपटू सेनादलाच्या सुरज देसाई याने लक्ष वेधताना ५२.५ लाख रुपयांची किंमत मिळवली. ‘ब’ गटात झालेली ही स्पर्धेतील सर्वोच्च बोली ठरली. दिल्लीने सुरजला आपल्या संघात घेतले. त्याचवेळी पहिल्या व दुसºया दिवशी मिळून १२ फ्रँचाईजींनी एकूण ४८ करोडपैकी ४६.९९ करोड रुपये खर्च केले. पहिल्या दिवशी सेनालदलाच्याच नितिन तोमरने तब्बल 93 लाखांची किंमत मिळवताना वर्चस्व मिळवले होते.
लिलावाच्या पहिल्या दिवशी ‘अ’ गटातील अव्वल देशी व परदेशी खेळाडूंचा लिलाव झाल्यानंतर दुसºया दिवशी ‘ब’, ‘क’ व ‘ड’ गटातील खेळाडूंचा लिलाव झाला. या दोन्ही दिवशी मिळून १२ फ्रँचाईजींनी एकूण २२७ खेळाडूंची निवड केली. यामध्ये नितिन तोमर, रोहित कुमार आणि मनजीत चिल्लर हे स्टार खेळाडू सर्वात महागडे खेळाडू ठरले. त्याचवेळी कोरियाचा स्टार अष्टपैलू जँग कुन ली हा अपेक्षेप्रमाणे महागडा परदेशी खेळाडू ठरला असून त्याला बंगाल संघाने आपल्याकडेच ८०.३ लाखांची किंमत देऊन कायम राखले.
पहिल्या दिवशी फ्रँचाईजींनी स्टार खेळाडूंना पसंती देताना सर्वाधिक बोली लावली, तर दुसºया दिवशी सर्वच फ्रँचाईजींनी संघ समतोल बनवण्यावर भर देताना विचारपुर्वक बोली लावली. यामध्ये सुरज देसाईवर जवळपास सर्वच संघांची चढाओढ लागली आणि दिल्लीने त्याला ५२.५० लाख रुपयांची सर्वाधिक बोली लावून आपल्या संघात घेतले. त्याचप्रमाणे ज्युनिअर राष्ट्रीय कांस्य पदक विजेत्या सचिनला गुजरात संघाने ३६ लाखांची किंमत देऊन आपल्या संघात घेतले.
अव्वल ५ महागडे खेळाडू (किंमत लाखांमध्ये)
भारतीय:
१. नितिन तोमर - यूपी (९३)
२. रोहित कुमार - बंगळुरु (८१)
३. मनजीत चिल्लर - जयपूर (७५.५)
४. सुरजीत सिंग - बंगाल (७३)
५. सेल्वामनी के. - जयपूर (७३)
परदेशी :
१. जँग कुन ली (कोरिया) - बंगाल (८०.३)
२. अबोझर मोहाजेरमीघनी (इराण) - गुजरात (५०)
३. अबोलफझल मघसोद्लो (इराण) - दिल्ली (३१.८)
४. फरहाद रहिमी मिलघरधन (इराण) - तेलगू (२९)
५. खोमसान थोंगखाम (थायलंड) - हरयाणा (२०.४)
‘ब’ गट :
१. सुरज देसाई - दिल्ली (५२.५)
२. जयदीप सिंग - जयपूर (५०)
३. निलेश साळुंखे - तेलगू (४९)
४. सोमवीर शेखर - जयपूर (४५.५)
५. बाजीराव होडगे - दिल्ली (४४.५)
............................................
१२ फ्रँचाईजींनी केलेला खर्च (किंमत करोड मध्ये)
१. बंगाल : ३ कोटी ९६ लाख ७० हजार
२. बंगळुरु : ३ कोटी ९३ लाख ९० हजार
३. दिल्ली : ३ कोटी ९२ लाख १५ हजार
४. गुजरात: ३ कोटी ८९ लाख ५० हजार
५. हरयाणा : ३ कोटी ८६ लाख ७५ हजार
६. जयपूर : ३ कोटी ९२ लाख ६० हजार
७. पटणा : ३ कोटी ८३ लाख ९० हजार
८. पुणे : ३ कोटी ८० लाख ४० हजार
९. तामिळनाडू : ३ कोटी ९५ लाख ९० हजार
१०. तेलगू : ३ कोटी ९६ लाख ७० हजार
११. यूपी : ३ कोटी ९२ लाख ६० हजार
१२. मुंबई : ३ कोटी ९८ लाख ६५ हजार