मुंबई : प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या सत्रात हरयाणा स्टीलर्स आणि पाटणा पायरेट्स यांच्यातील सामन्यात पाटणाचा कर्णधार प्रदीप नरवालने विक्रमी कामगिरी केली. प्रो कबड्डी लीगच्या इतिहासात त्याने मोठा पराक्रम केला आहे.
प्रदीपने या सामन्यात चढाईतील 700 गुणांचा पल्ला ओलांडला. अशी कामगिरी करणारा तो दुसरा खेळाडू आहे. प्रदीपने अवघ्या 71 सामन्यांत हा पराक्रम केला. याच कामगिरीसाठी राहुल चौधरीला 84 सामने खेळावे लागले. चढाईत सर्वाधिक गुण कमावणाऱ्या खेळाडूंमध्ये प्रदीप 713 गुणांसह अव्वल स्थानावर गेला आहे. चढाईत सर्वाधिक गुण कमावणारे खेळाडूप्रदीप नरवाल ( पाटणा पायरेट्स) 713राहुल चौधरी ( तेलगु टायटन्स) 700अजय ठाकूर ( तमिळ थलायव्हाज) 616दीपक हुडा ( जयपूर पिंक पँथर्स ) 541काशिलिंग आडके ( बेंगळुरु बुल्स) 518