Pro Kabaddi League 2021-22 Day 3 Preview : प्रो कबड्डीच्या पहिल्या दोन दिवसात सामने खूपच रोमांचक झाले. आता तिसऱ्या दिवशीदेखील थरार पाहायला मिळणार आहे. पहिला सामना विजयी सलामी दिलेल्या मुंबई आणि दिल्ली यांच्यात आहे. दुसऱ्या सामन्यात बंगळुरू बुल्स आणि तमिळ थलायवाज आपल्या पहिल्या विजयासाठी मैदानात उतरणार आहेत. तर तिसऱ्या सामन्यात बंगाल वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स विजयी लय कायम राखण्यासाठी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. पाहूया याच संदर्भातील महत्त्वाची आकडेवारी.
यू मुंबा विरूद्ध दबंग दिल्ली - यू मुंबा आणि दबंग दिल्ली या दोन्ही संघांनी यंदाच्या हंगामातील आपला पहिला सामना जिंकला आहे. यू मुंबाने बंगळुरू बुल्सला तर दिल्ली पुणेरी पलटणला मात दिली आहे. त्यामुळे दोन विजेत्यांमध्ये चांगलीच टक्कर पाहायला मिळेल. या स्पर्धेच्या इतिहासा मुंबई आणि दिल्ली १६ वेळा एकमेकांसमोर आले आहेत. त्यापैकी १२ वेळा मुंबईने तर तीन वेळा दिल्ली बाजी मारली आहे.
बंगळुरू बुल्स विरूद्ध तमिळ थलायवाज - बंगळुरूला पहिल्या सामन्यात यू मुंबाने मोठ्या फरकाने मात दिली होती. तर थलायवाजने टायटन्सशी सामना बरोबरीत सोडवला होता. त्यामुळे हे दोन्ही संघ आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहेत. आतापर्यंतचा इतिहास पाहता हे दोन संघ आठ वेळा आमनेसामने आले असून सात वेळा बंगळुरूने बादी मारली आहे.
बंगाल वॉरियर्स विरूद्ध गुजरात जायंट्स - या दोन्ही संघांनीही हंगामाची सुरूवात विजयाने केली आहे. बंगालने यूपी योद्धा संघाला धूळ चारली होती. तर गुजरातने जयपूरला पराभवाचं पाणी पाजलं होतं. त्यामुळे या दोन संघांमध्येही चांगली लढत पाहायला मिळू शकते. आतारपर्यंत हे दोन संघ ५ वेळा आमनेसामने आले असून गुजरातने दोन वेळा सामना जिंकला आहे. तर दोन सामने बरोबरीत सुटले आहेत. बंगालला मात्र केवळ एकच सामन्यात विजय मिळवता आला आहे.