मुंबई : प्रो कबड्डी लीगने सोमवारी दहाव्या सीझनसाठी 'एलिट रिटेन्ड प्लेअर्स', 'रिटेन्ड यंग प्लेअर्स' आणि 'एक्झिस्टिंग न्यू यंग प्लेयर्स'ची घोषणा केली. एकूण ८४ खेळाडूंना ३ श्रेणींमध्ये कायम ठेवण्यात आले असून २२ एलिट रिटेन्ड प्लेअर्स (ERP) श्रेणीतील, २४ रिटेन्ड यंग प्लेअर्स (RYP) श्रेणीत आणि ३८ विद्यमान न्यू यंग प्लेयर्स (ENYP) श्रेणीत आहेत. रिटेन्ड न केलेल्या खेळाडूंमध्ये पवन सेहरावत आणि विकास कंडोला यांसारख्या स्टार्सचा समावेश आहे. मुंबईत ८ ते ९ सप्टेंबर दरम्यान PKL सीझन १० खेळाडूंचा लिलाव होईल.
संघांनी कायम ठेवलेल्या टॅलेंट पूलमध्ये युवा आणि अनुभवी खेळाडूंमध्ये उत्तम संतुलन आहे. PKL दिग्गज प्रदीप नरवालला यूपी योद्धाने कायम ठेवले आहे. अस्लम मुस्तफा इनामदारला पुणेरी पलटणने कायम ठेवले आहे. सीझन ९ मधील मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर अवॉर्ड विजेता अर्जुन देशवालला जयपूर पिंक पँथर्सने कायम ठेवले आहे.