मुंबई : प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या पर्वात पुणेरी पलटणच्या गिरीश इर्नाकने एक वेगळा विक्रम नावावर केला. यू मुंबाविरुद्धच्या त्या सामन्यात पराक्रम गाजवून अनोखा विक्रम नावावर करणारा तो महाराष्ट्राचा पहिला खेळाडू ठरला.
या सामन्यापूर्वी गिरीशला पकडीचे द्विशतक पूर्ण करण्यासाठी 4 गुणांची आवश्यकता होती. यू मुंबाविरुद्धच्या सामन्यात त्याने हा पल्ला गाठला. त्याने यंदाच्या सत्रात 8 सामन्यांत पकडीच्या 29 गुणांसह अग्रस्थान घेतले आहे. या कामगिरीसह त्याने पकडीच्या गुणांचे द्विशतकही पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा तो महाराष्ट्रातील पहिलाच खेळाडू ठरला आहे.
गिरीशने 77 सामन्यांत पकडीचे 201 गुण कमावले आहेत. त्याच्या नावावर एकूण 210 गुण जमा आहेत. पकडीचे दोनशे गुण कमावणारा गिरीश हा महाराष्ट्राचा पहिला आणि एकूण सहावा खेळाडू ठरला आहे. पकडीचे सर्वाधिक गुण कोणाकडे1) मनजीत छिल्लर – 262 (80 मॅच)2) संदीप नरवाल – 225 (89 मॅच)3) सुरेंद्र नाडा – 222 (71 मॅच)4) रवींद्र पहल – 219 (71 मॅच)5) मोहित छिल्लर- 217 (80 मॅच)6) गिरीश इरणक – 201 (77 मॅच)