प्रो कबड्डीच्या शनिवारचे पहिले दोन्ही सामने बरोबरीत सुटले. यू मुंबा आणि यूपी योद्धा सामना २८-२८ असा तर बंगळुरू बुल्स आणि तेलुगू टायटन्स सामना ३४-३४ असा टाय झाला. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात तरी विजेता मिळणार असं वाटत असताना दबंग दिल्ली आणि तमिळ थलायवाज सामनादेखील ३०-३० असा बरोबरीतच सुटला. प्रो कबड्डीच्या यंदाच्या हंगामात अनेक सामने बरोबरीत सुटले होते, पण एका दिवशीचे सगळेच सामने टाय होण्याची ही पहिलीच वेळ ठरली.
यू मुंबा, यूपी योद्धाचे स्टार खेळाडू 'फेल'; सामना बरोबरीत (२८-२८)
यू मुंबा आणि यूपी योद्धा दोन्ही संघांनी अतिशय संथगतीने सुरूवात केली. सावधपणे प्रत्येक चढाई करत दोन्ही संघांनी गुण मिळवण्यास सुरूवात केली. पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघात फारसं अंतर नव्हते. हाफ टाईमनंतर सामन्याला थोडी गती मिळाली, पण दोन्ही संघ बरोबरीनेच पुढे जात होते. त्यामुळे अखेरपर्यंत कोणत्याही संघाला जिंकता आलं नाही. यू मुंबाचा फजल अत्राचली आणि यूपी योद्धाचा प्रदीप नरवाल दोघांनीही काहीच कमाल दाखवता आली.
शेवटच्या मिनिटांत टायटन्सला बुल्सने रोखलं बरोबरीत (३४-३४)
पहिल्या सामन्याप्रमाणेच दुसऱ्या सामन्यातही दोन्ही संघात काँटे की टक्कर पाहायला मिळाली. हाफ टाईमपर्यंत सामन्यात पुढे काय होणार, याचा अंदाजच येत नव्हता. मोक्याच्या क्षणी अंकीत बेनवालने रेड पॉईंट्स मिळवल्याने सामन्यात रंगत आली होती. पण बंगळुरू बुल्सने सांघिक कामगिरीच्या जोरावर सामना बरोबरीत सोडवण्यात यश मिळवलं.
तमिळ थलायवाज-दबंद दिल्ली सामनाही बरोबरीतच! (३०-३०)