नवी दिल्ली : चुरशीच्या झालेल्या लढतीत पुणेरी पलटणने गुजरात फॉर्च्युन जायंट्स संघावर 33-31 असा विजय मिळवला. अखेरच्या मिनिटापर्यंत कोणता संघ सामना जिंकेल, हे सांगता येत नव्हते. पण पुण्याच्या संघाने अनुभव पणाला लावत या सामन्यात विजय मिळवला.
या सामन्यात गुजरातच्या संघाकडून दमदार आक्रमण पाहायला मिळाले, पण त्यांना चांगल्या पकडी करता आल्या नाही आणि सामना गमवावा लागला. दुसरीकडे पुण्याच्या संघाने पकडींवर चांगलाच भर दिला. पुण्याने यावेळी एकदा गुजरातचा संघ ऑलआऊट केला.
दिल्लीचा 'दबंग' विजय; जयपूरवर विजयआज झालेल्या पहिल्या सामन्यात दिल्ली दबंगच्या संघाने जयपूर पिंक पँथर्सवर 35-24 असा दमदार विजय मिळवला.
दिल्लीच्या संघाने खोलवर चढाया केल्या आणि त्याचबरोबर जोरदार बचावही केली. या दोन्ही गोष्टींमध्ये दिल्ली जयपूरपेक्षा वरचढ ठरली. दिल्लीने यावेळी जयपूरचा संघ दोनदा ऑल आऊट केला.
दिल्लीने या सामन्यात चढाईमध्ये 21 गुण मिळाले, तर जयपूरला 19 गुण मिळवता आले. दिल्लीने पकडींमध्येही जयपूरपेक्षा जास्त गुण मिळवले. दिल्लीने चढाईमध्ये आठ गुण मिळवले, पण जयपूरला पकडींमध्ये फक्त तीन गुण मिळवता आले