हैदराबाद, प्रो कबड्डी : पुणेरी पलटणला आपल्या पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. हरयाणा स्टीलर्सने पुण्याच्या संघाला 34-24 असे पराभूत करत विजयी सलामी दिली.
पुणे आणि हरियाणा या दोन्ही संघांनी चांगल्या चढाया केल्या, पण पकडींमध्ये मात्र हरीयाणाने बाजी मारली. चढायांमध्ये हरणायाने 15 तर पुण्याने 14 गुण कमावले. पण चढाईमध्ये मात्र हरयाणाने 14 आणि पुण्याने 10 गुण कमावले. त्याचबरोबर हरयाणाने दोनदा पुण्याचा संघ ऑल आऊट केला. त्यामुळे त्यांना दोन लोण चढवल्याचे चार गुण मिळाले.
यु मुंबाला पहिला धक्का; जयपूरचा विजययु मुंबाला यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच धक्का बसला. मुंबाला जयपूर पिंक पँथर्सने 42-23 असे पराभूत केले.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच पँथर्सने सामन्यावर वर्चस्व ठेवले होते. पहिल्या सत्रातही त्यांनी मुंबाला पिछाडीवर टाकले होते. पँथर्सने आक्रमण आणि बचाव या दोन्ही गोष्टींवर आपले प्रभुत्व असल्याचे दाखवून दिले.
पँथर्सने मुंबाच्या एकूण गुणांपेक्षा जास्त फक्त चढाईमध्ये मिळवले. पँथर्सने चढाईमध्ये 25 गुणांची कमाई केली, तर मुंबाला 18 गुण कमावता आले. पँथर्सने मुंबाच्या खेळाडूंच्या चांगल्या पकडीही केल्या. पँथर्सने पकडींमध्ये 11 गुण पटकावले, तर मुंबाला फक्च पाच गुण मिळवता आले. पँथर्सने यावेळी मुंबावर तीनवेळा लोण चढवले.