नवी दिल्ली : गतविजेत्या पंजाब रॉयल्सने एकतर्फी झालेल्या सामन्यात वर्चस्व राखताना हरियाणा हॅमर्सला ६-३ असे लोळवत प्रो रेसलिग लीगच्या तिस-या सत्राचे जेतेपद पटकावले. सामन्यातील पहिल्या लढतीत पराभूत झाल्यानंतर ग्रिगोजेर्वा एनास्तसिजा, फांटा कोम्बा, गेनो पेट्रोशिवली, पूजा ढांडा आणि जोराबी यांच्या चमकदार विजयाच्या जोरावर पंजाबने बाजी मारली. त्याचवेळी, हरियाणाला सलग तिसºयांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.पहिल्या लढतीत दिग्गज व्लादिमिर खिंचेगशविली याने हरियाणाला आघाडीवर नेताना नवीन कुमारला ४-० असे लोळवले. अनास्तासिजाने सरिताला ७-२ असा धक्का देत सामना बरोबरीत आणला. खेतिक त्साबोलोव याने जितेंदर किन्हाचा १५-० असाधुव्वा उडवत पुन्हा एकदा हरियाणाला २-१ असे आघाडीवर आणले. यानंतर मात्र पंजाबच्या मल्लांनी विजयाचा धडाकाच लावला. कोम्बा हिनेपूजा सिंगला ७-०, जेनोने सुमित मलिका १६-०, पूजा ढांडाने वर्ल्ड आणि आॅलिम्पिक चॅम्पियन हेलेन मारोलिसला ३-२ असे, तर झुराबीने करण मोरला ४-०- असे नमवले. या शानदार विजयासह पंजाबने ५-२ अशी विजयी आघाडी घेतली.पुढच्या लढतीत सुन यनानने निर्मला देवीचा १०-३ असा पराभव केला, पण तो पर्यंत उशीर झाला होता. अखेरच्या नवव्या लढतीत मौसम खत्रीने हरियाणाच्या रुबेलजीतरंगीचा ४-२ असा पराभव करुन पंजाबच्या दिमाखदार विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. (वृत्तसंस्था)
प्रो रेसलिंग लीग : पंजाब हॅमर्सने जेतेपद राखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 1:14 AM