शहरं
Join us  
Trending Stories
1
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
2
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण
3
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वादावर असदुद्दीन ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
4
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
5
तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात मोठी कारवाई! टीटीडीकडून 'या' डेअरीच्या विरोधात तक्रार दाखल
6
सत्ता आल्यावर कसा निवडला जाणार मविआचा मुख्यमंत्री? पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला फॉर्म्युला 
7
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
8
Video - "मी ऑनलाइन गेममध्ये १५ लाख गमावले, मला ५००-५०० रुपयांची मदत करा"
9
Swiggyचा आयपीओ येण्यापूर्वी राहुल द्रविड पासून करन जोहर पर्यंत दिग्गजांच्या उड्या, पाहा डिटेल्स
10
मुंडेंच्या परळीत पवारांची मोर्चेबांधणी: राजेभाऊ फड यांच्या हाती तुतारी; तिकीट मिळणार?
11
'मला आशा आहे, तुम्ही उत्तर द्याल'; अरविंद केजरीवाल यांचे मोहन भागवतांना पत्र
12
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
13
रोहित पवार बैठकीत मोबाईल, बाटल्या, चाव्या फेकून मारतात; राम शिंदेंचा खळबळजनक आरोप
14
लख लख चंदेरी... आलिया भटचा पॅरिस फॅशन वीक मध्ये 'जलवा'; पाहा अभिनेत्रीचे Photos
15
“मराठा समाजाला त्यांचे हक्क मिळावे, यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न”: देवेंद्र फडणवीस
16
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
17
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाआडून देशाविरोधात षडयंत्र; JPC सदस्याचा खळबळजनक दावा
18
आर्याला घराबाहेर का काढलं? बिग बॉस मराठीचे 'बॉस' खुलासा करत म्हणाले- माणूस म्हणून त्रास...
19
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
20
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं

पुजारा, आश्विन यांचा चमकदार खेळ

By admin | Published: October 12, 2016 7:12 AM

तिसऱ्या आणी अखेरच्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताने न्यूझीलंडविरुद्ध एक दिवस राखून मोठ्या अंतराने बाजी मारली. कदाचित खेळपट्टीकडून फिरकी गोलंदाजांना अधिक मदत मिळाली

तिसऱ्या आणी अखेरच्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताने न्यूझीलंडविरुद्ध एक दिवस राखून मोठ्या अंतराने बाजी मारली. कदाचित खेळपट्टीकडून फिरकी गोलंदाजांना अधिक मदत मिळाली. मात्र, तरीही रविचंद्रन आश्विनने केलेल्या उच्चस्तरीय फिरकी गोलंदाजीचे श्रेय कमी होत नाही. त्याने, रवींद्र जडेजासह न्यूझीलंड संघाला तंबूत धाडले. याच खेळपट्टीवर सकाळच्या सत्रामध्ये चेतेश्वर पुजारा आणि गौतम गंभीर यांनी ज्या प्रकारे मोकळेपणे फलंदाजी केली त्याने खूप प्रसन्न वाटले. आधी त्यांनी स्थिरावण्यास चांगला वेळ घेतला आणि खेळपट्टीचा योग्य अंदाज आल्यानंतर काही अप्रतिम फटके मारताना भारताला मजबूत स्थितीत आणले. कोहलीने पुजाराचे शतक होण्याची प्रतीक्षा केली. त्याने खूप वेळाने शतक झळकावले. किवींना दुसऱ्यांदा बाद करण्यासाठी आपल्याकडे बराच वेळ असल्याची जाणीव कोहलीला होती. शिवाय, खेळ इतका लवकर संपेल, याची खुद्द कोहलीलाही कल्पना नव्हती; परंतु आश्विनने फलंदाजांवर अधिक दबाव टाकून त्यांना फिरकीच्या जाळ्यात अडकवून पुन्हा एकदा सर्वाधिक बळी घेताना सामन्यात १३ बळी मिळविले. या वेळी त्याने आणखी एकदा मालिकावीर पुरस्कार मिळवताना सामनावीरचा किताबही पटकावला.पुजाराने मालिकेमध्ये चांगली फलंदाजी केली; पण या चांगल्या सुरुवातीचे प्रथम श्रेणीप्रमाणे शतकामध्ये रूपांतर करण्यात त्याला यश आले नाही. या वेळी त्याने कोणताही धोका न पत्करताना काही अप्रतिम फटके मारून शतक झळकावले. यामुळे आगामी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतसाठी त्याचा आत्मविश्वास वाढविण्यास मदत मिळेल. गंभीरदेखील चांगला खेळला. त्यामुळे यापुढे सलामीवीरच्या निवडीसाठी निवडकर्त्यांची चांगली परीक्षा लागेल. कारण इंग्लंड मालिकेपर्यंत धवन आणि राहुल दोघेही दुखापतीतून सावरले असतील. जर किवी फलंदाजांनी पुजाराच्या फलंदाजीचा अभ्यास केला असता, तर त्यांनी भारताला टक्कर दिली असती. टॉम लॅथमने मालिकेच चमकदार फलंदाजी केली. परंतु, पुजाराप्रमाणेच तोही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. त्याला पहिल्या डावात अर्धशतक झळकावण्याची संधी होती; पण उमेश यादवचा वेगवान मारा ‘अ‍ॅक्रॉस द लाईन’ खेळल्याचा फटका त्याला बसला आणि तो सहजपणे पायचीत झाला. विल्यम्सनदेखील काहीसा चाचपडताना दिसला. शिवाय, फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर तो आश्विनचा चार वेळा शिकार ठरला. आॅफ स्टम्पच्या अधिक बाहेर जाऊन खेळल्याने त्याने स्वत:लाच अडचणीत टाकले. त्यामुळे वळत असलेले चेंडू अधिक आतमध्ये आल्याने त्याने विकेट बहाल केली. गुप्टिलला काहीशी लय मिळाली होती; पण संघाचा पराभव टाळण्यात ते पुरेसे नाही ठरले. तर, इतर फलंदाज जणू काही मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळत असल्याचे भासले. आश्विनने केवळ संयमी फिरकी मारा करून त्यांना माघारी धाडले. मैदानात न्यूझीलंडने चांगली चिकाटी दाखविली; पण हीच चिकाटी त्यांनी फलंदाजीत दाखवली असती, तर त्यांचा धावफलक अधिक चांगला दिसला असता. (पीएमजी)