ऑनलाइन लोकमतबंगळुरू, दि. 16 - गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर पुणे संघाने बंगळुरुचा 27 धावांनी पराभव केला. पुणे संघाने दिलेल्या 162 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरु संघाला निर्धारित 20 षटकात 9 बाद 134 धावा करता आल्या. पुण्याकडून शार्दुल ठाकूर आणि स्टोक्सने प्रत्येकी दोन बळी मिळवले. 162 रन्सना प्रत्त्युत्तर देताना बंगळुरूचा निम्मा संघ 104 वरच पॅव्हेलियनमध्ये परतला होता.बंगळुरुकडून कर्णधार विराट कोहली 28 आणि एबी 29 धावांचे योगदान दिले. पण ते संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले. जाधव, वॉटसन, बिन्नी, पवन नेगी यांचे प्रयत्न बंगळुरुला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले. दरम्यान, पुण्याची चांगली सुरूवात होऊनही पुण्याचा निम्मा संघ 129 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. डावाच्या सुरूवातीला अजिंक्य रहाणे आणि त्रिपाठीने चांगली सुरूवात करून दिली. त्यांनी बिनबाद 50रन्स धावफलकावर लावल्या. हे दोघे माघारी गेल्यावर महेंद्रसिंग धोनीने स्टीव्हन स्मिथच्या साथीने डाव सांभाळला. धोनीची विकेट गेल्यानंतर पुण्याचा डाव पत्त्यांच्या बंगल्यांसारखा कोसळला. 127 ला 2 विकेट्स या स्कोअरवरून पुण्याचा डाव 130 ला 7 विकेट्स अशा अतिशय दयनीय स्थितीत आला. पण शेवटच्या काही ओव्हर्समध्ये मनीष तिवारीने सूत्रं हातात घेत तुफान फटकेबाजी केली त्यामुळे 161 रन्सचा पल्ला पुण्याने गाठला.
पुण्याचा बेंगळुरुवर २७ धावांनी विजय
By admin | Published: April 16, 2017 11:56 PM